Shirur News : शिरुर : बहिण भावाच्या अतूट प्रेमाचा सण म्हणजेच रक्षाबंधन. तसेच निसर्गाचा समतोल राखणारे तसेच मानवाचा खरा आधार स्तंभ आँक्सिजन देणारे वृक्ष आहेत. त्यामुळे मानवजातीचे रक्षण करण्यासाठी वृक्षांना रांजणगाव गणपती येथील महागणपती ग्रुप ऑफ स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी राखी बांधून अनोखे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला.
झाडांना राखी बांधून साजरे केले रक्षाबंधन
भारतीय संस्कृती प्रमाणे विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून हा सण साजरा करण्यात आला. सध्या शिरूर तालुक्यामध्ये पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे; याच पार्श्वभूमीवर वृक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे (Shirur News) या अनुषंगाने या दिवशी झाडांना औक्षण करून राखी बांधण्यात आली. त्याचप्रमाणे वृक्षांचे संवर्धन करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.
वृक्षांचे संवर्धन केले तरच ऋतुचक्र व्यवस्थित चालेल. ज्याप्रमाणे आपला भाऊ आपले रक्षण करतो त्याचप्रमाणे झाडेही आपले रक्षण करतात. (Shirur News) आपल्या जीवनामध्ये झाडांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
दरम्यान, महागणपती ग्रुप ऑफ स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास शेळके यांच्या संकल्पनेतून हा आगळावेगळा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी शुभांगी कालेकर यांनी रक्षाबंधन विषयीची आख्यायिका विद्यार्थ्यांना सांगितली.
यावेळी श्री महागणपती ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अरविंद गोळे, पर्यवेक्षक निलेश पापळे, महागणपती इंग्लिश मीडियम स्कूल उपप्राचार्य अबेदा अत्तार, (Shirur News) अक्षरनंदन गुरुकुल स्कूलचे प्राचार्य वंदना खेडकर, श्री महागणपती ग्लोबल स्कूल प्राचार्या पद्मिनी कवठेकर,एच ओ डी सोनाली नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका पवार यांनी केले. तर प्रियांका जोरी यांनी आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : चासकमानचे पाणी पेटले; ऐन पावसाळ्यात शेतकरी रस्त्यावर!
Shirur News : राष्ट्रीय समाज पक्षाचा २० वा वर्धापन दिनानिमित्त पुण्यात जय्यत तयारी