युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : वेळ रात्री सव्वाआठची, आठवडे बाजार आणण्यासाठी लौकी वरून कळंबला चाललो होतो. संभेमळ्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मक्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मोटार सायकलवर हल्ला केला. रात्रीच्या अंधारात पाठिमागून झालेल्या हल्ल्यात पायाला बिबट्याने धरले. जखमा झाल्या पण मी तशीच गाडी रैस करत फुल स्पिडने गाडी पुढे नेली. अंधारात काळाने झडप घालावी अन त्यातून सुदैवाने हाता पायावर जखमा झाल्याने आम्ही बचावलो नाहितर बिबट्याने आमची शिकार केली होती. अशा भितीदायक भावना लौकी ( ता. आंबेगाव ) येथील हरिभाऊ वाघ आणि मंगेश थोरात या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. (Two youths injured after being attacked by a leopard)
या घटनेची माहिती घेऊन आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी या जख्मी शेतकऱ्यांची भेट घेतली.(Shirur News) त्यावेळी हे दोघेही शेतकरी भयभीत होऊन प्रसंग सांगत होते. अंगावरील जख्मा दाखविल्या नंतर तत्काळ वनविभागाला कळवून मंचर ग्रामिण रूग्णालयात पुढील उपचारासाठी या शेतकऱ्यांना पाठविण्यात आले.
आंबेगाव तालुक्यातील कळंब येथून हे दोन्ही शेतकरी लौकी येथील आठवडे बाजार घेऊन घरी निघाले होते. लैकी रस्त्यावर मारूती थोरात यांच्या सुंभमळा वस्तीच्या अलीकडे मक्याच्या शेतातून बिबट्याने हरीभाऊ वाघ व मंगेश थोरात यांच्या दुचाकीवर हल्ला चढवला. त्यावेळी या दोघांच्याही अंगावर बिबट्याने हल्ला केल्याने जखमा झाल्या होत्या. (Shirur News) प्रसंगावधान साधून हरीभाऊ वाघ यांनी गाडी रेस करत फुल स्पिडने पुढे नेली. त्या काळात गाडीच्या आवाजाने बिबट्याने पुन्हा शेतात धुम ठोकली. त्यानंतर खासगी रूग्णालयात जाऊन त्यांनी जखमांवर प्राथमिक उपचार केला. मंगेश थोरात यांच्या डाव्या हाताला खोलवर जखम आहे. आणि पायाला बिबट्याने ओरखडल्याच्या जखमा आहे.डाव्या हाताला बिबट्याने तीन दात ओरखडल्याच्या जख्मा आहेत. हरीभाऊ वाघ यांच्या डाव्या पायाला जखम आहे. प्राथमिक उपचार करून त्यांना मंचर येथील जिल्हा ग्रामिण रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याचे येथील शेतकरी अर्जून कानडे व संतोष कानडे यांनी सांगितले.
नरभक्षक ठरणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करा : देवदत्त निकम
आंबेगाव तालुक्यातील चांडोली व लौकी या परिसरात मागिली काळात पाच घटना घडल्या आहेत. मानवावर होणारे बिबट्याचे हल्ले हे प्राणघातक ठरू शकतात. सदरच्या घटनेत दोन तरून जखमी झाले असून वनविभागाने तत्काळ या ठिकाणि पाच पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा. बिबट्या नरभक्षक होण्याअगोदर त्याला जेरबंद करून जुन्नर माणिकडोह बिबट निवारा केंद्रात घेऊन जावा. या पुढील काळात अशा घटना घडणार नाहित याची काळजी वनविभागाने घ्यावी. अशी माहिती आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : वाढत्या उन्हात आरोग्याची काळजी घ्या; डॅाक्टरांचा नागरिकांना सल्ला
Shirur News : शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गजबज वाढली