अमिन मुलाणी
Shirur News : सविंदणे, (पुणे) : चणा जोर गरम बाबू…शेंगदाणे घ्या कुणी फुटाणे, अगदी स्वस्तात आहेत बर, गरम गरम वडापाव, अगदी आदबीन ग्राहकाशी हितगुज करत पाणी पुरी, भेळ, बटाटे वडे यासारखे अनेक पदार्थ विकण्यासाठी विद्यार्थी दुकानदार झाले होते. ग्रामस्थांनी देखील ग्राहक बनून या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.गरम गरम पदार्थ्यांवर ताव मारला.
११ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आले…
प्रसंग होता शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरशालेय प्रो- कबड्डीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या निमित्ताने विद्यार्थ्यांनी खाऊगल्लीचे आयोजन केले होते. या स्पर्धांचे उद्घाटन मुख्यमंत्री कार्यालयातील माजी सहसचिव दत्तात्रय थोरात यांनी केले. कान्हूर मेसाईचे उद्योजक संदिप तांबे हे कार्यक्रमाचे प्रयोजक होते.
‘प्रत्येक विद्यार्थ्याला तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविता येत नाही. मात्र त्यांच्यामध्ये खेळण्याची क्षमता असते. अशा खेळाडूंसाठी आंतरशालेय स्पर्धा आयोजित करून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा या विद्यालयाचा प्रयत्न आहे’ असे मत दत्तात्रय थोरात यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या वेळी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष गंगाधर पुंडे, सचिव सुदाम तळोले, उद्योजक संदीप तांबे, माजी सरपंच दादा खर्डे, उद्योजक अमोल पुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बबनराव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य मोहन पुंडे, सरपंच संघटनेचे तालुका सरचिटणीस सतीश इचके, माजी उपसरपंच दिपक तळोले, ग्रामपंचायत सदस्या राजश्री रुपनेर, प्रा. अशोक शिंदे, क्रीडाशिक्षक चंद्रकांत शिंदे, क्रीडा समीक्षक संतोष साळुंके, निखिल पुंडे, पर्यवेक्षक किसन पांढरे, आनंदा तळोले, भाऊसाहेब तळोले, अशोक शिंदे, सी. टी. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी या क्रिडा खेळाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान मिळावे. व्यवहार करताना होणाऱ्या चुका टाळल्या जाव्या. यासाठी खाऊगल्लीचा उपक्रम घेण्यात आला. मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांना खाऊ गल्लीतले पदार्थ तयार करण्याची संधी मिळावी. यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संयोजन क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर पुंडे, प्रा. मच्छिंद्र राऊत यांनी केले. दहावीचा संघ विजेता तर अकरावीचा संघ उपविजेता झाला. विजय संघाला संदिपदादा तांबे गौरव चषक व रोख ११ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आले.