युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर ः नवीन शैक्षणिक वर्ष १५ जून पासून सुरू होत आहे. सुट्टी संपवून विद्यार्थ्यांना आता शाळेचे वेध लागले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील विविध माध्यमातील शाळा गुरूवारी ( ता. १५ ) पासून गजबजणार आहे. त्यासाठी आता विद्यार्थ्यांसह पालकांना वह्या, पु्स्तके, गणवेश अशा शालेय साहित्याच्या खरेदीचे वेध लागले आहे. त्यामुळे या आठवड्यापासून सर्वत्र शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी गडबड दिसून येत आहे.(There was a rush in the market for the purchase of educational materials)
दोन वर्षापुर्वी कोरोना महामारीच्या संकटामुळे शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले होते. या काळात मोबाईल वरचे डिजीटल शिक्षणाने वेगळी वाट शैक्षणिक धोरणात निर्माण केली. त्यामुळे शैक्षणिक साहित्या पेक्षा मोबाईल वरून दिलेल्या शिक्षणाकडे विद्यार्थ्यांची ओढ निर्माण झाली. त्यामुळे शैक्षणिक साहित्य घेण्याची गरज कमी झाल्याचे दिसून आले. (Shirur News) या काळात पालकांना पाल्यासाठी नवीन मोबाईल विकत घेऊन देण्याकडे कल वाढला होता. पण आपल्याकडे शाळेत जाऊन शिक्षण घेण्याची पद्धत फार जून्या काळापासून आहे. त्यामुळे पुन्हा शाळा उघडल्या काही अंतर ठेवून पुन्हा सुरू झालेल्या शाळेत विद्यार्थी संख्या वाढवून परिक्षा संपन्न झाल्या. त्यात आठवी पर्यंत पास करण्याचे धोरण असल्याने आठवी पर्यंतचे सगळेच विद्यार्थी पुढच्या वर्गात प्रवेश घेताना दिसतात.
शैक्षणिक साहित्याच्या दरात वाढ झाल्याने पालकांचा खिसा होणार रिकामा
यावर्षी शैक्षणिक साहित्याच्या दरामध्ये सरासरी २० टक्क्यांनी वाढ आहे. त्यामुळे पालकांच्या खिशाला मात्र चाट बसत आहे.पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळत असली तरी खासगी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके विकत घ्यावी लागत आहेत. त्या बरोबर शालेय गणवेश, शूज, वह्या, चित्रकला वही, कंपास, पेन पेन्सिल, पेपर घेण्यासाठी शालेय साहित्याच्या दुकानात गर्दी होताना दिसू लागली आहे. शैक्षणिक साहित्याच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाली. वाढलेली इंधनाची दरवाढ ही विक्रेत्यांबरोबर पालकांनाही बसलेली पहावयास मिळत आहे.(Shirur News) लिखाणासाठी वापरल्या जाणाऱ्या पेनच्या किंमतीतही वाढ झाली आहे. आत्तापर्यंत ५ रूपयांना मिळणारा साधा पेन आता ७ रूपयांना घ्यावा लागत आहे. शैक्षणिक साहित्यात देखील दरवाढीचा परिणाम विद्यार्थ्यांना जाणवू लागला आहे.
पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप…
समग्र शिक्षा अभियानातून मोफत पाठ्यपुस्तके योजने अंतर्गत शैक्षणिक वर्षे २०२३ – २०२४ साठी पहिल्याच दिवशी पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहे. तसेच सर्व शाळांना एकच गणवेश राज्य शासनाने जाहिर केलाआाहे. तोही एकाच दिवशी वाटप केला जाणार आहे. असे जाहिर करण्यात आले आहे.
चिमुकल्यांच्या साहित्यांच्या दरात वाढ…
स्कूल बॅग, वाटर बॅग, वह्या, चित्रकला वही, कंपास पेटी, छत्री, रेणकोट तसेच गणवेश आदी दरातह मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मोठ्या मुलांच्या तुलनेत शिक्षणाच्या खर्चात लहान मुलांच्या शैक्षणिक साहित्याचा खर्च मोठा असल्याचे पालक बोलू लागले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : कौतुकास्पद! वादन कला अवगत असलेला तरुण मुंबई लोहमार्ग पोलिस दलात भरती