योगेश पडवळ
Shirur News : पाबळ : ओढा ओलांडताना पाय घसरून तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील माळीवस्ती परिसरात रविवारी (ता. २४) सकाळी दहा वाजण्याच्या सुमरास घडली आहे.
माळीवस्ती परिसरात घडली घटना
राजेंद्र विक्रम कोळी ( वय-२५, राहणार मालखेडा. ता. मुक्ताईनगर जि. जळगाव ) असे पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र कोळी हा तरुण मुळचा जळगाव जिल्ह्यातील असून विजेचे खांब उभे करण्याचे काम करतो. हा तरुण मुळचा जळगाव जिल्ह्यातील असून विजेचे खांब उभे करण्याचे काम करतो. त्याच्या एका साथीदारासह दोघे ओढ्याकडे गेले होते. (Shirur News) राजेंद्र उडी मारत असताना घसरून पडल्याचे त्याच्या साथीदाराने सांगितले. राजेंद्र कोळी जिथे तो पडला. तेथे गोलाकार आकाराचा मोठा खड्डा होता . त्यामुळे तो खड्ड्यात अडकला की प्रवाहात वाहून गेला याचा अंदाज येत नव्हता.
या घटनेची माहिती समजताच पंचायत समिती सदस्य डॅा. सुभाष पोकळे, उपसरपंच उत्तम जाधव, बाबू खाडे, विक्रम घोडे, संतोष घोडे ग्रामस्थांसहित शोध घेण्याचा प्रयत्न केला. (Shirur News) निवासी नायब तहसिलदार स्नेहलता गिरीगोसावी, मंडल अधिकारी माधुरी बागले, कवठेच्या कामगार तलाठी ललिता वाघमारे,सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले, पोलिस कर्मचारी उमेश भगत, विष्णू दहीफळे, दीपक पवार, पोलिस पाटील गणेश पवार घटनास्थळी पोहचले होते.
दरम्यान, महानगरपालीका च्या शोध पथकाने सायंकाळ पर्यंत शोध कार्य सुरू ठेवले होते. मात्र तरूणाचा शोध लागला नाही. पुणे पिएमआरडीच्या फायर ब्रिगेडचे विशेष पथकास पाचारण करण्यात आले. (Shirur News) उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते, अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : टोमॅटोची लाली उतरली; उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी
Shirur News : टाकळी हाजी परीसरात समाधानकारक पाऊस
Shirur News : वळसे पाटील महाविद्यालयात महिला आरोग्य शिबिर संपन्न..