Shirur News : शिरूर : शेतमालाच्या बाजारभावावर नियंत्रण आणण्यासाठी शेतमालाची आयात करायची. त्यातून शेतमालाचे बाजारभाव पाडायचे. या प्रकारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी दोनशे रूपये किलोवर गेलेले टोमॅटो आता कवडीमोल भावाने विकले जात आहेत. घाऊक बाजारात मिळणारा दर पाहता, उत्पादकांना वहातूक खर्च काढणेही कठीण झाले आहे. मात्र, उत्पादीत मालाची विल्हेवाट कशी लावावी, या विवंचनेत शेतकऱ्यांनी टोमॅटो बागा सोडून दिल्या आहेत.
वाहतूक खर्च परवडेना!
नारायणगाव (ता. जुन्नर) येथे टोमॅटोची बाजारपेठ आहे. येथे आंबेगाव, शिरूर व जुन्नर या भागातील ग्रामीण भागातून गावरान टोमॅटो बाजारपेठेत येतो. जून व जुलैमध्ये टोमॅटो २५० रूपये किलो विकला गेला. देशभरात टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. (Shirur News) त्यावर नियंत्रणासाठी केंद्राने आॅगस्ट महिन्यात टोमॅटो आयात केला. त्यातून बाजारभाव खाली आणले. त्यानंतर मात्र टोमॅटोचे दर चढले नाहीत. त्याउलट दर इतके खाली आले आहेत, की आता उत्पादक शेतकऱ्यांच्याच डोळ्यांत पाणी आले आहे.
स्थानीक बाजार समितीच्या माध्यमातून महिनाभरापासून टोमॅटोचे दर निचांकी पातळीवर आले आहेत. पाच ते सात रूपये किलोने घाऊक बाजारात टोमॅटोची विक्री होत आहे. किरकोळ बाजारात पाच ते दहा रूपये किलो दरावर स्थिरावला आहे. २० किलोचा कॅरेट ५० ते ८० रूपयांवर विक्री झाल्याचे शेतकरी बोलू लागले आहेत. (Shirur News) गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी टोमॅटोला उच्चांकी दर मिळाला. त्यावेळी ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आले होते. उत्पादकांची चांदी झाली, असे बोलले जात होते. या काळात टोमॅटो चोरीच्या घटना ही घडल्या. आता मात्र टोमॅटोला कोणी विचारेनासे झाले आहे. नवीन उत्पादीत टोमॅटो बाजारात येण्यासोबत आयातीत टोमॅटोची भर त्यात पडली आहे.
खर्च परवडेना, भांडवलही निघेना
बाजारातील सध्याचे दर बघता उत्पादकांना तो बाजारात आणण्याचा वाहतूक खर्च परवडेनासा झाला आहे. मात्र, टोमॅटो ठेवायचा कुठे व त्याची विल्हेवाट कशी लावायची, या विवंचनेत शेतकरी नुकसान सहन करीत टोमॅटो बाजारात आणत आहेत. (Shirur News) शासनाने टोमॅटो आयात करून ग्राहकहीत पाहिले. त्याबरोबर आता शेतकऱ्याचे हीत जोपासत, टोमॅटोला दर वाढवून मिळण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
देवदत्त निकम, संचालक, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : टाकळी हाजी परीसरात समाधानकारक पाऊस
Shirur News : वळसे पाटील महाविद्यालयात महिला आरोग्य शिबिर संपन्न..