Shirur News : शिरूर : शिरूर तालुक्याच्या बेट भागात विकासाची कामे केल्याने या भागाचे नंदनवन झाल्याचे पहावयास मिळू लागले आहे. राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील व शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमामधुन परीसरातील विविध कामे मार्गी लागले आहेत. यापुढेही प्रलंबित प्रश्नासाठी सर्वानी सर्वजण मिळून प्रयत्न करू असे प्रतिपादन घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे यांनी केले. Shirur News
विविध कामे मार्गी..
निमगाव दुडे ( ता. शिरूर) येथे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमा मधुन अंगणवाडी इमारतीचे भुमिपुजन गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, सरपंच शशिकला अमोल घोडे, उपसरपंच शहाजी पवार, कवठेचे उपसरपंच उत्तम जाधव, पोलीस पाटील बाळासाहेब पानगे, माऊली पानगे, सदस्य अविनाश मोरे, अंकुश कांदळकर, तंटामुक्ती सुनील पानगे, जालिंदर पानगे, अशोक खडसे, पंकज घोडे, संभाजी पानगे, शहाजी रामदास पवार, योगेश बारहाते, तुळशीराम दुडे, भास्कर पानगे, दिनेश पठारे, अरुण पोपट पानगे, दत्ता गायकवाड, अमोल घोडे, शांताराम पवार, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. Shirur News
दरम्यान, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल घोडे यांनी केले. तर सुत्रसंचालन विक्रम पवार यांनी केले. सरपंच शशिकला घोडे यांनी आभार मानले. Shirur News