Shirur News : शिक्रापूर : पुणे जिल्ह्यातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. कारला अचानक लागलेल्या आगीमध्ये कारचालकासह कार जळून खाक झाली आहे. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव सांडस ता. शिरुर येथील राक्षेवाडी फाटा येथे रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती शिरुर पोलिसांनी दिली आहे. शनिवारी १० जून रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे.(The car caught fire suddenly; Car driver died in fire)
संभाजी शहाजी राक्षे (वय ४८ वर्षे रा. रा. रांजणगाव सांडस ता. शिरुर जि. पुणे) असे होरपळून मृत्यू झालेल्या कार चालकाचे नाव आहे. याप्रकरणी ऋषिकेश संभाजी राक्षे (वय २१ वर्षे रा. रांजणगाव सांडस ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर (Shirur News) पोलीस ठाण्यात माहिती दिली.
आगीचे कारण अस्पष्ट
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी राक्षे हे शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील या स्विफ्ट कारमधून चाललेले होते. घरापासून एक किलोमीटर अंतरावर राक्षे यांची कार आलेली असताना कार रस्त्यालगत जळालेल्या अवस्थेत दिसून आली. कार जळत असल्याचे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी काही नागरिकांच्या मदतीने कारची आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कारमध्ये चालकाचा आगीमध्ये होरपळून खाक होऊन मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली. (Shirur News) त्यानंतर शिरुर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी कारला लागलेल्या आगीमध्ये संभाजी राक्षे यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. तर कारचा अपघात होऊन कारला आग लागली असावी अथवा कारमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. संभाजी राक्षे यांना कारमधून बाहेर पडणे शक्य न झाल्याने त्यांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : मृग नक्षत्रात भरपूर पाऊस; पंचागकर्त्यांचे मत, हत्ती वाहन सुरु