Shirur News शिरूर : कवठे (ता. शिरूर) येथील श्री येमाई देवीच्या मुखवट्यावर जरेकाठची साडी, त्यावर वेगवेगळी सुवर्ण अलंकार, फुलांचे हार आणी सुंगधी धुप उदबत्तीने सजलेली सवाद्य गावातून निघालेला पालखी सोहळा त्यापुढे पारंपारिक वाद्यांनी धरलेला ठेका आणि भावीकांची गर्दी. (Shirur News) चौकात विठ्ल नामाचा जयघोष करत भजनात तल्लीन झालेले भावीकांनी रंगत चढवली होती. ग्रामस्थ व भावीकांनी दर्शन घेतले. (Shirur News)
श्री येमाई देवीचा पालखी सोहळा आजपासून मोठ्या दिमाखात सुरु
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे आषाढ व श्रावण महिण्यात दर मंगळवारी श्री येमाई देवीचा पालखी सोहळा आयोजीत करण्यात येतो. सोमवार ( ता. १९) ला जेष्ट महिना संपला असून आषाढ महिन्याला सुरवात झाली आहे. आषाढ महिण्यातील पहिल्याच म्हणजे आज मंगळवार (ता.२०) पासून श्री येमाई देवीचा पालखी सोहळा मोठ्या दिमाखात निघाला. भावीकांनी दर्शनासाठी यावेळी गर्दी केली होती.
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील श्री येमाई देवी हे कुलदैवत आहे. त्यामळे राज्यातून भावीक या देवीच्या दशर्नासाठी गर्दी करताना दिसतात. चैत्र पोर्णिमेला यात्रा भरवली जाते. त्या काळात देखील मोठ्या प्रमाणात भावीक येथील श्री येमाई देवीस नवस फेडण्याकरिता गर्दी करताना दिसतात. त्यानंतर जेष्टाच्या महिन्यात देखील शुक्रवार, रवीवार व मंगळवारी भावीक मोठ्या प्रमाणात येऊन येथे मुक्काम करतात.
यानंतर आषाढ महिना सुरू झाला की दर मंगळवारी गावातून सवाद्य पालखी सोहळा निघतो. या काळात येथे भजनाचे कार्यक्रम होतात. हारतुरे व नारळ वाढविण्याचा कार्यक्रम केला जातो. श्रावण महिण्याच्या शेवटच्या मंगळवार पर्यंत हा पालखी सोहळा संपुर्ण गावातून सवाद्य मिरवणूक काढून केला जातो.
या नंतर नवरात्र मध्ये श्री येमाई देवी मंदिरात मोठा उत्सव असतो.
दरम्यान, या उत्सवाला मुंबई, बीड, औरंगाबाद, नगर, नाशिक या भागाबरोबर परिसरातील नागरिक हजेरी लावताना दिसतात. पहिल्याच मंगळवारी जैन धर्मीयांच्या वतीने गावातून सवाद्य पालखी सोहळा काढण्यात आला होता. ग्रामपंचायत च्या चावडीवर आरती होऊन या पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली.