युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : आर्टिफिशियल इंटिलिजन्स यातील धोके ओळखून सुरक्षा बाळगणे महत्वाचे आहे. जे लोक मोठ्या प्रमाणात मोबाईल व सोशल मीडियाचा वापर करतात ते पुढे जाऊन कर्करोगाचे रूग्ण होतात. सायबर क्राईमबाबत लोकसभा किंवा विधानसभेत नवीन कायदे करताना त्यासाठी तुमच्या काही सूचना असतील तर कळवा. धोकादायक ॲपपासून दूर राहा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सायबर क्राईम व सोशल मीडिया वापराबाबत धोके ओळखावे, असे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
मंचर ( ता. आंबेगाव ) येथे सायबर सुरक्षा दिंडी मंचर पोलीस स्टेशन व पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे सायबर अवेरनेस, सायबर क्राईम व सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. (Shirur News) या कार्यक्रमात ते बोलत होते. सायबर सुरक्षा दिंडी कार्यक्रमात आण्णासाहेब आवटे महाविद्यालय, महात्मा गांधी हायस्कुल, अवसरी खुर्दचे शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालातील विद्यार्थी व शिक्षक कार्यक्रमाला उपस्थित होते.
पुणे ग्रामीणचे अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे म्हणाले की, सायबर क्राईममध्ये गुन्ह्यांना प्रतिबंधाबरोबरच गुन्ह्यात आपण कसे अडकले जातो. (Shirur News) तसेच ऑनलाईन गुन्हे करणारे गुन्हेगार यांच्या पद्धतीबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपल्याला आदर्श असताना नवीन पिढी आकर्षणामुळे गुन्हेगारीकडे वळत आहे.
सोशल मीडियावरील अफवा अथवा बातमीची खात्री करणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा वापर बेकायदेशीर, विनाशाकडे जाणारा नसावा. तो विकासाकडे जाणारा असावा.
सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घेणे गरजेचे
सायबर मैत्र / GRY चॅरिटेबल फाऊंडेशन संस्थापक व अध्यक्ष मुक्ता चैतन्य म्हणाल्या की, सध्या भारतात मोबाईलच्या वापराचा अतिरेक होत असून, मोबाईलच्या जास्तीत जास्त वापरातून तरूणपिढीचा अनावश्यक वेळ जात आहे. सोशल मीडियावरील पोस्ट, फोटो, रिल त्यावरील लाईक यांचे आकर्षण, मोबाईल गेमिंगमध्ये अभ्यास सोडून मोबाईलवर अनपेक्षित अडकला जातो. सोशल मीडियाचा वापर करताना त्याची माहिती पूर्णपणे घेणे आवश्यक आहे. (Shirur News) अनावश्यक प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच ओटीपी कोणाला देऊ नये, कोणत्याही लिंक क्लिक करू नये तसेच सध्याचे इंटरनेट आणि कॉम्प्युटर व ऑनलाईन बँकिंग, अँन्ड्रॉइड मोबाईलचे युगात इंटरनेट आणि कॉम्प्युटरच्या सहाय्याने असे कोणतेही काम अनोळखी व्यक्ती किंवा गटाद्वारे केले जाते. ज्यामुळे दुसऱ्या व्यक्तीची किंवा समूहाची आर्थिक फसवणूक किंवा मानसिक ताण होऊ शकतो. यापासून सावध राहिले पाहिजे. अधिकृत ॲप्लिकेशनचा वापर करावा.
या कार्यक्रमासाठी दिलीप वळसे पाटील, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक मितेश घट्टे, पुणे ग्रामीण सायबर मैत्र/ GRY चॅरिटेबल फाऊंडेशन संस्थापक व अध्यक्ष मुक्ता चैतन्य, खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, मंचर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, पारगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहु थाटे, आंबेगावचे तहसिलदार नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, आण्णासाहेब आवटे कॉलेजचे प्रा. गार्डी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : लाखणगाव येथील अपघाती कुटूंबाच्या सांत्वनाला ‘ती’ ला ही अश्रु अवरेना…
Shirur News : डिंभा धरण ९५.८७ टक्के भरले ; घोडनदी पत्रातून २८०० क्युसेसने पाणीसाठा विसर्ग