शुभम वाकचौरे
Shirur News : जांबूत : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने दिलेल्या एक दिवसीय बंदच्या हाकेला जांबूत (ता. शिरूर) येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जांबूत गावामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद
जांबूत गावात सकाळपासून सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली होती. गावातील सर्व समाजबांधवांनी पायी मोर्चा काढत जालना घटनेचा निषेध नोंदवला. या वेळी सरपंच दत्तात्रय जोरी, माजी सरपंच बाळासाहेब फिरोदिया, माजी सरपंच बाळकृष्ण कड, (Shirur News) माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी, बाळासाहेब बदर, ग्रामपंचायत सदस्य राहुल जगताप, सुभाष जगताप, पोपटशेठ फिरोदिया, माऊली जगताप, संतोष जोरी, बाळू जोरी, दिनकर थोरात आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या मोर्चाला दुकानदार व नागरिकांनी पाठिंबा दर्शविला.
जालना जिल्ह्यातील सराटी या गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सहकाऱ्यांसह उपोषण सुरू केले होते. (Shirur News) हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरू होते. या आंदोलनास ग्रामस्थांनीही पाठिबा दिला होता. आंदोलक मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती खालावत चालल्याने उपोषण मागे घेण्याची विनंती प्रशासनाने केली. मात्र, ते उपोषणावर ठाम आहेत. याच वेळी पोलिसांनी आंदोलनात सहभागी असणाऱ्या तरुणांवर, स्त्रियांवर लहान मुलांवर तसेच वृद्धांवर अंदाधुंद लाठीचार्ज केला. लाठीचार्जनंतर जालना जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : ‘पुणे जिल्हा शिक्षण मंडळ’ या शैक्षणिक संस्थेचा ८३ वा वर्धापन दिन साजरा
Shirur News : विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्याबाबतचे धोके ओळखावे : दिलीप वळसे पाटील
Shirur News : लाखणगाव येथील अपघाती कुटूंबाच्या सांत्वनाला ‘ती’ ला ही अश्रु अवरेना…