शुभम वाकचौरे
Shirur News : जांबूत : जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी मोर्चा काढून आरक्षणाची मागणी केली जात आहे. शिरूर शहरात आज मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी शिरूर तहसील कार्यालयाच्या आवारात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.
तातडीने आरक्षण जाहीर करण्याची केली मागणी
या आंदोलनात राणी कर्डिले, वैशाली गायकवाड, शशिकला काळे, सुवर्णा सोनवणे, शृतिका झांबरे यांनी सहभाग घेतला. या वेळी मराठा समाजाला तातडीने आरक्षण जाहीर करावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली. (Shirur News) सायंकाळी नायब तहसिलदार स्नेहा गिरी-गोसावी व पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना निवेदन दिल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आले. उपोषण स्थळी दिवसभरात विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट देवून आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला.
या वेळी जिजामाता सहकारी बँकेच्या संचालिका मनिषा कालेवार, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कोमल वाखारे, संगीता शेवाळे, शोभना पाचंगे, वैशाली बांगर, संगीता रोकडे, ज्योती हांडे, राजश्री ढमढेरे, सविता बरूडे, जिजामाता सहकारी बँकेच्या संचालिका मनिषा कालेवार, (Shirur News) जिल्हा परिषद माजी सदस्या कोमल वाखारे, उमेश शेळके, अॅड. रवींद्र खांडरे, रमेश दसगुडे, रुपेश घाडगे, अविनाश घोगरे, कुणाल काळे, डॉ. सुभाष गवारी, गणेश जामदार, डॉ. वैशाली साखरे, रावसाहेब चक्रे आदी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : पिंपरी चिंचवड कलाकार संघाच्या वतीने शाहिर विलास अटक यांचा सन्मान
Shirur News : शिरूर तालुका भाजपच्या तालुकाध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे यांची फेरनिवड