युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : आई-वडील, दोन मुली अन एक मुलगा अस कुटूंब. शिक्षण घेऊन मोठ व्हा. शेतीत कष्ट करून जीवन सार्थकी लावा. अशी आई वडीलांची इच्छा, जेमतेम कुटूंब आणी दोन बहीनीची जबाबदारी पेलणारा कर्तबगार लहान भाऊ, पण काळाला ते पटल नाही. ऐन उमेदीत आलेल्या या भावावर चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकीमुळे अपघातात मृत्यू झाला. ताई…आता भाऊच राहिला नाही. आम्ही कोणाला राखी बांधायची. असे म्हणत गळ्यात पडून ती ढसढसा रडू लागली.
आता भाऊच राहिला नाही. आम्ही कोणाला राखी बांधायची
लाखणगाव ( ता. आंबेगाव ) येथे अपघातात मृत्यू पावलेल्या रसिक रंगनाथ दौंड (वय-१९) या युवकाचा अपघाती मृत्यू झाला. या कुटूंबाचे सांत्वन करण्यासाठी सहकार मंत्री दिलिप वळसे पाटील यांची कन्या पुर्वा वळसे पाटील आल्या होत्या. (Shirur News ) हा प्रसंग अनुभवताना त्यांना देखील अश्रु अनावर झाले होते.
लाखणगाव (ता. आंबेगाव) समोर बेल्हे जेजुरी हायवे रोडवर अल्टो गाडीने दुचाकी ला मागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील रसिक दौंड हा बुधवारी (ता. ६) सकाळी त्याच्याजवळ असलेली दुचाकीवरून जात असताना. पाठीमागून येणाऱ्या अल्टो गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. (Shirur News ) या अपघातात दुचाकी वरील रसिक याला हातापायास व डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
नुकतीच दहावीचे शिक्षण पूर्ण झालेल्या रसिक हा कॅालेजात जाऊ लागला होता. बहिनी दोन्ही मोठ्या असल्यातरी कुटूंबाची जबाबदारी रसीक पेलवत होता. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या जाण्याने दौंड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सहकार मंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या कन्या पुर्वा वळसे पाटील यांनी या कुटूंबाला भेट देऊन सांत्वन केले. त्यावेळी कुटूंबाच्या दुखाःने त्यांना अश्रु अनावर झाले होते. (Shirur News ) यावेळी आंबेगाव तालुक्याच्या राष्ट्रवादी कॅाग्रेस च्या अध्यक्षा सुषमा शिंदे, युवती अध्यक्षा अक्षदा शिंदे, अनुसया महीला उन्नती केंद्राच्या समन्वयिका ज्योती निघोट उपस्थित होत्या.
बेल्हा जेजूरी महामार्गावर अपघाताचे प्रमाण अधिक आहे. पाबळ, धामारी, लोणी व लाखणगाव या परिसरात रस्ता तयार झाल्यानंतर अपघात घडले आहेत. (Shirur News ) तरूणांनी देखील वाहनांचा वेगाची मर्यादा ओळखावी. वाहतूकीचे नियम पाळावे. तसेच रस्ता तयार करण्यात काही अडचणी असल्यास या बाबत देखील संबधीताना सुचना करण्यात येतील. असे पुर्वा वळसे पाटील यांनी सांगितले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : ‘या पुढे वारंवार भेटत राहू’ : पुर्वा वळसे पाटील
Shirur News : डिंभा धरण ९५.८७ टक्के भरले ; घोडनदी पत्रातून २८०० क्युसेसने पाणीसाठा विसर्ग
Shirur News : मराठा आंदोलकांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ कवठे येमाई गाव स्वयंस्फूर्तीने बंद