Shirur News : शिरूर, ता.१४ : टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील टेमकरवस्ती शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी संदिप करकंडे यांची तर उपाध्यक्षपदी गणपत वरखडे यांची निवड करण्यात आली. (Shirur News)
शाळा व्यवस्थापन समितीची नवीन निवड
शाळेत झालेल्या बैठकीत शाळा व्यवस्थापन समितीची नवीन निवड करण्यात आली. यावेळी माजी सैनिक संभाजी पवळे, दामूआण्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारुती नरवडे, निवृत्त प्राध्यापक अरुण साळवे, बली भोसले, राहुल वरखडे, मुख्याध्यापक विकास उचाळे, सहशिक्षक गहिनीनाथ सानप आदी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. (Shirur News)
दरम्यान, नवनिर्वाचित अध्यक्ष करकंडे व उपाध्यक्ष वरखडे यांचा सरपंच अरुणा घोडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच गोविंद गावडे, सोसायटीचे उपाध्यक्ष साहेबराव लोखंडे, माजी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष विजय थोरात, संपर्कप्रमुख स्वप्निल गावडे, शहाजी पवळे, राहुल सोदक आदी मान्यवर उपस्थित होते. (Shirur News)