Shirur News : तळेगाव ढमढेरे : केंदूर (ता. शिरुर) येथील सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला.
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांना आदरांजली
भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूच्या रामेश्वरमधील धनुषकोडी गावात झाला होता. (Shirur News) डॉ. अब्दुल कलाम हे भारतीय शास्त्रज्ञ होते. त्यांनी २००२ ते२००७ या काळामध्ये भारताचे राष्ट्रपती पद भूषविले. भारताच्या क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अशा या ज्येष्ठ शास्त्रज्ञांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येत असताना केंदूरमध्ये देखील रघुनाथराव ढवळे विद्यालयात बालकांच्या उत्साहात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक महादेव पाटील यांनी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षक महादेव पाटील, सुनील ढोक, चंद्रकांत थिटे, रमेश गावडे, ग्रंथपाल मनोज दोंड, नंदुलाल बहिरम, प्रतिभा शिर्के, सारिका पाटील आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी ग्रंथपाल मनोज दोंड यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथ वाचण्यात दिले. (Shirur News) तसेच शिक्षक व काही विद्यार्थ्यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले. सर्वांचे आभार ग्रंथपाल मनोज दोंड यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : टाकळी हाजी उपकेंद्र परिसरात महिनाभरात तब्बल १५ विद्युत रोहित्रांची चोरी
Shirur News : घरासमोर झोपलेल्या ज्येष्ठावर बिबट्याचा हल्ला; जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील घटना
Shirur News : जांबूत येथे दुकानाचे शटर उचकटून ५० हजार रुपयांच्या साहित्य व मशिनरीची चोरी..