Shirur News : शिरूर : तीन वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक श्रावण मासामध्ये संस्कृती व धार्मीक परंपरेला विशेष महत्व दिले आहे. या महिन्यातच बहुतेक जण तीर्थक्षेत्रास भेट देऊन दर्शनाचा लाभ घेतात. या महिण्यात अनेक यात्रा कंपन्या लांब पल्ल्याच्या सहलीचे आयोजन करतात. Shirur News
लेक व जावयालाही विशेष मान
ग्रामीण भागात देखील अष्टविनायक दर्शनासाठी सहलीचे नियोजन केले जाते. जांबूत ( ता. शिरूर ) येथे ग्रामस्थांनी अष्टविनायक दर्शनासाठी सहलीचे आयोजन केले होते. काशी, वैष्णवीदेवी, चारधामच्या सहली करण्याकडे अधिक कल असतो.
या अधिक मासामध्ये लेक व जावयालाही विशेष मान असतो. त्यांना यावेळी देण्यात येणार्या मिष्टांन्न भोजना बरोबर नवीन कपडे. चांदिच्या , तांब्याच्या वस्तू भेट दिल्या जातात. सध्या चांदीच्या वस्तू बनविण्यास पसंती दिली जात आहे. Shirur News