युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हुतात्मा बाबू गेनू जलाशय ( डिंभा धरण ) दुष्काळी जनतेसाठी दूरदृष्टी ठेवून उभे केले. या धरणातून जुन्नर, आंबेगाव, शिरूर परिसरात सुबत्ता येऊन शेती व्यवसाया बरोबर शेती पूरक व्यवसायातून भरभराट झाली. मात्र सत्ताधारी नेत्यांनी डिंभा धरणात बोगदा करून पाणी पळविण्याचा कट रचला आहे. डिंभा धरणात होणारा बोगदा याची खोली पहाता मृतसाठ्याला धोका पोहचण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरातील जनतेने सावध राहून पाणी पळविणाऱ्यांविरोधात एकत्रित येऊन विरोध केला पाहिजे. या आंदोलनात पहिल्यांदा मला अटक झाली तरी चालेल पण फक्त तुम्ही मागे उभे रहा. जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचे आवाहन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल यांनी केले. (Martyr Babu Gainu Reservoir (Dimbha Dam) Water Fight Will Go to Jail When Time Comes: Former Home Minister Dilip Valse Patil)
मलठण येथे झाली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक
मलठण ( ता. शिरूर ) येथे आंबेगाव शिरूर विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ४२ गावातून आलेल्या कार्यकर्त्यां बरोबर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. (Shirur News) यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी आंदोलनासाठी हात वर करून सहमत नोंदवला. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, सुर्यकांत पलांडे, आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघातील ४२ गावाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, भिमाशंकर कारखान्याचे व्हाईस चेअरमान प्रदिप वळसे पाटील, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, माजी सभापती सुभाष उमाप, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, घोडगंगेचे संचालक सुहास थोरात, बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर, पंचायत समिती सदस्या अरूणा घोडे, जिल्हा दूध संघाचे संचालक स्वप्निल ढमढेरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जगताप आदी प्रमुख पदाधिकारी, सरपंच व कार्यकर्ते उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले की, कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयी निवडणुकीने जनतेचा कल आता बदलत चाललेला पहावयास मिळत आहे. राज्यात महाविकास आघाडी एकत्रित लढली तर लोकसभा निवडणुकीत भाजपला त्यांची जागा जनता दाखवून देईल. (Shirur News) असा विश्वास वाटतो. देशातील सर्व पक्ष एकवटल्याने देशात सत्ता बदल होईल. कुकडी प्रकल्पाचे मूळ आराखड्यात छेडछाड करुन पाणी जर नगर जामखेडला नेणार असाल तर ते फार चुकीचे आहे. मुळातच कुकडी प्रकल्पातील जी ६ धरणे आहेत त्यामध्ये जे पाणी पावसाळ्यात जमा होत आहे. त्याचा पूर्ण वापर धरून कुकडी प्रकल्प आठमाही म्हणून अस्तित्वात आलेला आहे.
डिंभा, माणिकडोह, वडज, येडगाव, पिंपळगाव जोगा, चिल्हेवाडी त्यांचा पाणी वापर सुरू झालेला आहे. डिंभे धरणाचे पाणलोटावर घोडनदीवरील ३५ ते ४० बंधारे, धोड धरण(चिंचणी), अवलंबून आहेत. डिंभा डावा कालवा, उजवा कालवा, मीना शाखा, घोड शाखा, मिना नदिवरील १० ते १२ बंधारे, येडगाव धरणात फिडर म्हणून वापर होत आहे. संपूर्ण कुकडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नाही. माणिकडोह धरण पूर्ण क्षमतेने अजिबात भरत नाही. म्हणून डिंभाच्या पाणलोटातील पाणी कमी करुन बोगद्यातून माणिकडोहला घेवून गेल्यास आंबेगाव, जुन्नर, शिरुर,श्रीगोंदा तालुक्यातील काही भागावर निश्चितच परीणाम होणार आहे. माणिकडोहात पाणी घेवून थेट येडगाव मार्गे कुकडी डाव्या कालव्यात घेवून थेट प्रकल्पात सामाविष्ट नसलेल्या क्षेत्राला पाणी न्यायचा डाव दिसतोय. (Shirur News) त्यामुळे आराखडा तयार करताना शास्त्रानुसार जे क्षेत्र लाभ क्षेत्र म्हणून धरलय त्यालाच पूर्ण क्षमतेने मिळत नाही. मूळ प्रकल्पीय आराखड्यात बदल करुन बोगद्याला मोठा खर्च करून मूळ लाभक्षेत्रात ढवळाढवळ करणे अतिशय चुकीचे आहे. अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १० जूनला २४ वा वर्धापन दिवस आहे. यासाठी सगळ्यांनी यावे या भागातून जवळपास १० हजार कार्यकर्त्यांनी यावेत अशी अपेक्षा यावेळी वळसे पाटील यांनी व्यक्त केली.
पाचुंदकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेतृत्वाच्या दूरदृष्टीमुळे या भागाचा विकास झाला आहे. या विकासातून सर्वसामान्यनागरिक, शेतकरी, कामगार यांना बळ मिळाले आहे. (Shirur News) कुकडी प्रकल्पाचे पाणी पळविणाऱ्यांना योग्य़ धडा शिकविण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे. देशपातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पत्राचे बळ वाढविण्यासाठी अहमदनगर येथे अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : लहान भावावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या बाप लेकाला ७ वर्षाची सक्तमजुरी
Shirur News : शेतकऱ्याचा नादच खुळा ! फॉर्च्युनरमधून घेऊन आला घोडीला, Video Viral
Shirur news : बेट भागातील शाळांमधून बारावीच्या निकालाची टक्केवारी घसरली