Shirur News : शिरूर : जांबूत (ता. शिरूर) येथे श्रीकृष्ण जन्माअष्टमी व अंखड सप्ताहाच्या काल्याच्या किर्तनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला पहिल्यांदाच सहकार मंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या कन्या पुर्वा वळसे पाटील यांनी हजेरी लावली. त्यांनी त्यांच्या भाषणात अमेरीकेत शिक्षण घेऊन आल्याचे सांगत. न कळत आपला परिचय करत वळसे पाटील यांच्या वेगवेगळ्या विकास कामांविषयी सांगितले.
२०२४ च्या खासदार, आमदारकीच्या निवडणुकीत उमेदवार?
या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता. त्यांच्याशी सलगी करत पुर्वा यांनी मी या ठिकाणी पहिल्यांदाच आल्याचे सांगितले. यापुढे आपन वारंवार भेटत राहणार आहोत. (Shirur News ) फक्त तुम्ही बोलवा मी हजर होईल. ही काही वाक्य संभ्रम करणारी ठरली.
२०२४ मध्ये होणाऱ्या निवडणूकीत नक्कीच त्या उमेदवार असणार आहेत का? अशी कुजबूज या कार्यक्रमात सुरू झाली. मंचाच्या एकाबाजूने ‘चला प्रचार सुरू झाला’ असा ही यावेळी आवाज आला. (Shirur News ) पण २०२४ च्या निवडणुकीत त्या ‘खासदार’ की ‘आमदार’ पदासाठी त्या उमेदवार असणार याबाबत सगळ्यांच्याच मनात संभ्रम निर्माण झाला हे मात्र खरे.
यापुढे वांरवार भेटत राहू असे म्हणताना त्या पुढे म्हणाल्या. येथील कार्यकर्त्यांची मी कार्यक्रमाला येत नाही. अशी त्यांची तक्रार आहे. (Shirur News ) त्यावेळी त्या म्हणाल्या, अहो उलट माझी तक्रार आहे. की तुम्ही मला कार्यक्रमाला बोलवत नाही. मग मी तरी न बोलवताच कशी येऊ. यावेळी सभास्थानी चांगलाच हशा झाला.
दरम्यान, संयोजकानी देखील आम्ही पुढील कार्यक्रमाला नक्की बोलावू असे यावेळी रोखठोक सांगितले. पण ‘या पुढे वारंवार भेटत राहू’ या वाक्यावर पुढील निवडणुकीच्या झंझावातात त्या उमेदवार असणार का? असणार तर खासदार की आमदार असा संभ्रम निर्माण करून गेल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : डिंभा धरण ९५.८७ टक्के भरले ; घोडनदी पत्रातून २८०० क्युसेसने पाणीसाठा विसर्ग
Shirur News : मराठा आंदोलकांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ कवठे येमाई गाव स्वयंस्फूर्तीने बंद
Shirur News : ‘जय श्रीकृष्ण’ असे म्हणत परदेशी पाहुणे जपतात भारतीय संस्कृती