Shirur News : शिरूर : शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्यातील कामगार बांधव गेली ४३ दिवसांपासून संपात सहभागी झाले आहेत. १२ महिण्यांचा पगार व त्यांची २५ कोटी रुपये कारखान्याकडून येणं आहे. उदरनिर्वाहाचे साधन नसलेल्या कामगारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली. गेले दोन दिवसांपूर्वी घोडगंगा कारखान्याच्या कामगारांनी आम्हाला मदत करा,असे आवाहन केले होते. Shirur News
आम्हाला मदत करा,असे आवाहन
या कामगारांच्या आवाहनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून आली आहे. आणि कामगारांना मदतीचा हात पुढे केला असून विविध संस्था व समाजाने पुढाकार घेण्याचे आवाहन मनसे संघटनेने केले आहे. अशी माहिती शिरूर मनसे चे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महेबूब सय्यद यांनी दिली. Shirur News
सय्यद म्हणाले की, मनसे पक्षाने शहरात मदत फेरी काढून वस्तुस्वरुपात गोळा केल्या असून आज देखील मदत फेरी उर्वरित शहरात जाऊन मदत गोळा करणार आहे. तरी ज्यांना मदत करावयाची आहे त्यांनी संपर्क साधावा. या कामगारांना उद्या सर्व किराणा घेऊन जाणार आहे. Shirur News
यावेळी मनसेचे पुणे जिल्हाउपाध्यक्ष महिबुब सय्यद, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे मा. शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित शहराध्यक्ष रवी लेंडे, मनसेचे विधी विभागचे तालुकाध्यक्ष आदित्य मैड, महिला आघाडीचे डॉ.वैशाली साखरे, तारुआक्का पाठारे,मनसेचे माजी शहराध्यक्ष संदीप कडेकर,विकास साबळे,स्वप्निल माळवे ,सुशांत कुटे, रविंद्र गुळादे, बंडू दुधाणे आदी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. Shirur News
दरम्यान, आज सोमवार ( ता. १४ ) कारखान्यावर आंदोलन स्थळावर जाऊन सर्व किराणा किट घेऊन जाऊन कामगारां कडे मदत रुपी जमा झालेल्या वस्तू सुपूर्द करण्यात येणार आहे असे मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष महिबुब सय्यद आणि प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी सांगितले आहे.