योगेश पडवळ
Shirur News : पाबळ : देवावानी शेत माझं नवसाला पावलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं,
झाकली मूठ ही मिरगानं फेकली
निधळाची धार ती सर्गानं शिपली,
बाळरुप कोवळं शिवारात हासलं
धरतीच्या माऊलीनं दिनरात सोसलं..
कुबेराचं धन माझ्या..
भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा…भलं
थोडी ओल अन नंतर पडलेला रिमझीम पाऊस यावर झालेल्या बाजरी च्या पेरण्या, त्यातून शेतावर डोलणार बाजरी च पीक, यामुळे सध्या काही ठिकाणी बाजरी पीकाची काढणी तर काही राखण करण्याचे काम करत आहेत. पिकावर येणारी चिमणी पाखरे हुसकावताना वेगवेगळ्या युक्त्या करत भलरी गित गाताना शेतकरी दिसू लागले आहेत.
बाजरीचे पिक चांगले आल्याने बळीराजा समाधानी
शिरूर तालुक्यात बाजरीच्या लावगडीत यंदा पावसाअभावी केवळ ५७ टक्के पेरण्या झाल्या. पुणे जिल्ह्यात या वर्षी दुष्काळ असला तरी थोड्याफार ओलीवर अनेक शेतकऱ्यांनी बाजरी पिकाच्या पेरण्या केल्या होत्या. त्यातून मध्यंतरी पावसाने हजेरी दिल्याने या पिकाला जीवदान मिळाल्याचे दिसून येत आहे. (Shirur News) त्यातून सध्या शेत शिवारावर बाजरी पिक मोठ्या डोलाने डोलू लागले आहे. सध्या शेतकरी या पिकाची राखण करताना दिसू लागले आहेत.
दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. मात्र, डिंभा, चासकमान, वडज, माणिकडोह, पिंपळगाव जोगा या धरणांमुळे शेतकऱ्यांनी या हंगामातील बाजरी व मकेला पाणी दिल्याने पिके वाचले आहेत. बाजरीची पिके राखणीला आल्याने शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
दरम्यान, यंदा परिसरात बाजरीचे पीकच कमी असल्याने शेतकऱ्याला पक्षांन पासून संरक्षण करण्याचे आव्हान पुढे उभे राहिले आहे. यासाठी गोफन, फिल्मी पट्ट्या, कपडे बांधून या पिकाचे सरंक्षण केले जात आहे. कमी पावसामुळे पेरणी कमी झाली त्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्याने अनेक ठिकाणची पिके जळून गेली आहेत.
या वर्षी शिरूर तालुक्यातील परिसरात ५७ टक्के बाजरीच्या पिकाची पेरणी झाली होती. मात्र पावसाचा खंड पडल्याने ५० टक्क्या हून अधिक बाजरीचे पिके वाया गेले. (Shirur News) तर काही शेतकऱ्यांना कालव्याचे अथवा विहिरीचे पाणी देणे शक्य झाले त्यांचे पिके जोमात आले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात भिगवण बाजारात बाजरीचा १६७ नगाची आवक होऊन २२०० ते २६०० पर्यंत दर मिळाला होता. चालू वर्षी २३,०० ते ३१,०० पर्यंत दर मिळत आहे. गेल्यावर्षी ११,२२६ हेक्टर क्षेत्रावर बाजरीची पेरणी झाली होती. तर या वर्षी १०,००० हेक्टर क्षेत्रावर बाजरीच्या पिकाची पेरणी म्हणजेच ५७%हेक्टर पेरणी झाली आहे.
सिद्धेश ढवळे (कृषी अधिकारी – शिरुर तालुका )
थोड्याफार ओलीवर बाजरीची पेरणी करण्यात आली होती. नंतरचा पडलेला एक पावसावर बाजरीचे पिक आले आहे. सध्या बाजरी कणसात भरू लागली आहे. (Shirur News) त्यातून पिकाचे उत्पादन चांगले होईल. पण पक्षांपासून पिक वाचविण्याची कसरत करावी लागणार आहे. बाजरीची आयात केली नाही तर यावर्षी चांगला भाव बाजरी पिकाला मिळू शकतो.
सुदर्शन भाकरे (पोलिस पाटील चांडोह ता. शिरूर)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : शिरूर बस स्थानकाच्या इमारतीचा भाग डोक्यात पडल्याने महिला जखमी
Shirur News : गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हा दाखल करा; सकल मातंग समाजाची मागणी