योगेश पडवळ
Shirur News : पाबळ : कोण म्हणतो देणार नाय…! घेतल्या शिवाय राहणार नाय, जय शिवाजी जय भवानी…!, एक मराठा… लाख मराठा… अशा घोषणा देत शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलकांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळला. गावातून मोर्चा काढून या बंदला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
https://www.instagram.com/reel/Cw9g2sRIU8-/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==
मोर्चा काढून बंदला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कवठे येमाई ( शिरूर ) येथे ग्रामस्थांच्या वतीने गावातून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर बाजारतळावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. (Shirur News) या सभेत सर्व समाजाचे ग्रामस्थ या बंदला पाठिंबा देण्यासाठी जमले होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सुदाम इचके, राष्ट्रवादी कॅाग्रेसचे उपाध्यक्ष राजेश सांडभोर, उपसरपंच उत्तम जाधव, सोसायटीचे अध्यक्ष हौशीराम मुखेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठा आरक्षणाला विरोध करताना झालेला लाठीहल्ला हा या सरकारचा नाकर्तेपणा दिसून येतो. भविष्यात ही हुकूमशाही नष्ट करण्यासाठी तळागाळातील सर्व समाजाने एकत्रित राहण्याची गरज असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. कवठे येमाई येथे गाव बंद ठेवून मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यात आला. (Shirur News) शांततेत झालेल्या या सभेसाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, टाकळी हाजी, सविंदणे, जांबूत, पिंपरखेड, वडनेर, काठापूर या परिसरात देखील गाव बंद ठेवून महाराष्ट्र बंद ला पाठिंबा देण्यात आला होता. (Shirur News) या काळात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे बँक, पतसंस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. गावे बंद असल्याने गावागावात शुकशुकाट पहावयास मिळाला.
यावेळी पोलिस पाटील गणेश पवार, अविनाश पोकळे , रामदास सांडभोर, पांडुरंग भोर, निखिल घोडे, अविनाश पोकळे, नितीन इचके, संभाजी इचके, बाजीराव उघडे, दिपक रत्नपारखी, मोहन पडवळ, विक्रम इचके, मिट्टुशेठ बाफना, रितेश शहा, भरत भोर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व ग्रामपंचायत सदस्य आरक्षणासाठी सर्व समाजातील नागरिक आज या बंद मध्ये सामील झाले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : ‘जय श्रीकृष्ण’ असे म्हणत परदेशी पाहुणे जपतात भारतीय संस्कृती