साहेबराव लोखंडे
Shirur News : टाकळी हाजी : ढोल लेझीम, सनई, ढोल ताशांचे पारंपारिक वाद्य, रंगीबेरंगी फुले, फुगे आणि विद्युत रोषणाईत रंगविलेली बैल आणि डिजेच्या सहाय्याने नृत्यावर थिरकणारी तरूणाई यातूनच सर्वपित्री दर्श आमावस्येला भाद्रपदी बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे भाद्रपद पोळा शेतकरी बांधवांनी बैलांची मिरवणूक काढत उत्साहात साजरा केला. कृषीप्रधान देशातला महत्त्वाचा उत्सव म्हणून या सणाची ओळख आहे. शेती व्यवसायात यांत्रिकीकरण झाल्याने ट्रॅक्टर व औजारांचा वापर वाढला. (Shirur News) त्यातून बैलांची संख्याही घटत गेली. तरीही बळीराजाच्या जीवनात बैंलाच स्थान कायम असल्याने संस्कृती जिवंत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
काही भागात श्रावण व काही भागात भाद्रपद महिन्यात अमावस्येला महाराष्ट्रात सर्जा-राजाचा बैलपोळा सण साजरा केला जातो. (Shirur News) बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो. येथे मोठ्या प्रमाणात बैलांना सजवून त्यांची नैवेद्य व पुजा करण्यात आली. कवठे येमाई, मलठण, चांडोह या ठिकाणी बैलांची मिरवणूकही काढण्यात आली होती.
परंपरा कायम राखण्यासाठी बैलगाडा मालक प्रयत्नशील
पूर्वीच्या काळी बैलपोळा म्हटले की पंधरा ते वीस दिवसांपासून तयारी सुरू व्हायची. बैलांना सजविण्यासाठी लागणारे बहुतांश साहित्य घरीच तयार केले जाई. बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बैलांना कामामधून उसंत दिली जायची. (Shirur News) बैलांप्रती असलेला आदर व्यक्त केला जायचा. तीच परंपरा कायम राखण्यासाठी बैलगाडा मालक प्रयत्नशील असल्याचे बैलगाडा विमा कंपनीचे शिरूर आंबेगाव उपाध्यक्ष बन्सीशेठ घोडे यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : सुगरणींची खोपे देताहेत विणीच्या हंगामाची चाहूल
Shirur News ;दुर्गे दुर्घटभारी तुजवीन संसारी;! मुलींना शिक्षणाच बळ देणारी रणरागीणीरेखा भुजबळ
Shirur News : केंदूरच्या रघुनाथराव ढवळे विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा