Shirur News : शिरूर : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ आक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून एक तास श्रमदान मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागात सर्वत्र स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते.
गावागावांत स्वच्छता अभियान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ आक्टोबर रोजी देशभर श्रमदान मोहिम राबविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार पुणे जिल्ह्यात एक तास श्रमदान करण्याचे नियोजन तयार करण्यात आले होते. महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला ही मोहीम राबवून महात्मा गांधीजींना हीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे. (Shirur News) जिल्ह्यात गावागावांत सार्वजनीक ठिकाणी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य केंद्र मंदिरे, बाजारतळ, बसस्थानक, नदी किनारा या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्याचे ठरले आहे.
कवठे येमाई (ता. शिरूर) येथे सरपंच सुनिता पोकळे व ग्रामसेवक चेतन वाव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियानाला सुरूवात करण्यात आली. त्याबरोबर दोन ज्येष्ठ महिला, नागरिकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
जांबूत (ता. शिरूर) येथे सरपंच दत्ता जोरी व ग्रामसेवक एच. एम. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वच्छता मोहिमेला सुरूवात करण्यात आली. (Shirur News) यामध्ये ग्रामस्थांचा मोठा सहभाग होता.
मलठण (ता. शिरूर) येथे स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली होती. टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे सरपंच अरूणा घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान करण्यात आले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा
Shirur News : दारू पिणाऱ्या १७५ वाहन चालकांना दंड ; कारवाई आणखी तीव्र होणार