Shirur News : शिरूर : बिबट हा त्याच्या उंचीएवढ्या भक्षावर हल्ला करतो. यासाठी शेतात बसून काम करत असताना जवळ काठी बाळगा. पाळीव प्राण्यांवरील हल्ले हे नुकसानभरपाई देऊन काही अंशी भरून काढता येतील. मात्र, मानवावरील हल्ल्यांची किंमत पैशांमध्ये करता येत नाही. यासाठी राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिरूरचे वन अधिकारी प्रताप जगताप यांनी केली.
बिबट्याने उच्छाद मांडल्याने मार्गदर्शन
जांबूत (ता. शिरूर) येथे आयोजित दहीहंडी व ४२ साव्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. या वेळी हरिदासपालवे महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन झाले. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, भिमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, युवा नेत्या पूर्वा वळसे पाटील, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, पंचायत समितीचे माजी सदस्य डॅा. सुभाष पोकळे, शिवसेना जिल्हा प्रमुख (ठाकरे गट) सुरेश भोर, सागर दांगट, सरपंच दत्तात्रेय जोरी, उपसरपंच राणी बोऱ्हाडे, वासुदेव जोरी, नाथा जोरी, बाळासाहेब फिरोदिया, बाबाशेठ फिरोदिया, पोपट फिरोदिया, सुभाष जगताप, बाळकृष्ण कड, अरूण कदम, अनिल जोरी, योगेश जोरी, दिनेश थोरात, सुखदेव गाजरे, बाळासाहेब बदर, दिनेश गाजरे, आनंद शिंदे, कारभारी थोरात, डॅा. खंडू फलके, मु्ख्याध्यापक सतीष फिरोदिया आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
ज्ञानेश्वर महाराज जवळेकर, निलेश महाराज पवार, सुनिताताई कातोरे, भरत महाराज थोरात, सतीष महाराज काजळे, श्रद्धेश कृष्ण महाराज शास्त्री यांची अनुकमे सात दिवस किर्तन सेवा झाली. महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जाधव यांनी केले. लहू गाजरे यांनी आभार मानले.
वनविभागाची जागरूकता मोहिम…
अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभात जांबूत परिसरातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. या परिसरात बिबट्याने उच्छाद मांडल्याने मार्गदर्शन आवश्यक होते. हा योगायोग पाहून किर्तनात वनअधिकारी प्रताप जगताप यांनी टाळकरी बनून सहभाग घेतला. कुटूंब वारकरी सांप्रदायाचे असल्याचे सांगत, वन्य प्राण्यांना संरक्षण देण्याचा कायदा आहे, अशी माहिती देत त्यांनी बिबट्यापासून बचाव करण्यासाठी अनेक उपाययोजना सांगितल्या. भविष्यात वाडी-वस्तीवर, शाळेत अशा प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या भागात दिवसा विजेची मागणी करून, जागरूकता निर्माण करण्यात आली. नागरिकांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.