Shirur News शिरूर : जुन्नर तालुक्याचा विकास करत असताना पवार कुटूंबाशी असणारे संबध संभाळले आहेत. जेष्ट नेते शरद पवार हे आमचे दैवत असून अजीत पवार आमचे नेते आहेत. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी घेतलेल्या भुमीकेनंतर राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षात उभी फूट पडली. या घटनेमुळे हृदयाची आणि डोक्याची घालमेल झाली असल्याने आपण तटस्थ राहणार आहे. आपण २०२४ ची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचेही जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. आमदार बेनके यांनी घेतलेल्या निर्णयाने तालुक्यातील घडामोडींवर सध्या तरी पडदा पडला आहे.( Shirur News)
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नर तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रकाश ताजने, जिल्हा परिषदेचे माजी नियोजन सदस्य विकास दरेकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष उज्वला शेवाळे, कात्रज डेअरीचे संचालक भाऊ देवाडे, श्रीराम पतसंस्थेचे चेअरमन तानाजी डेरे,विनायक तांबे,बाळासाहेब खिलारी, शहराध्यक्ष रोहिदास केदारी, अजिंक्यतारा पतसंस्थेचे चेअरमन गणेश वाजगे, उपसरपंच ज्योती संते, वैष्णवी चतुर, अक्षदा मांडे व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.( Shirur News)
द्विधा मनस्थिती असल्याने तटस्थ भूमिका.
आमदार बेनके म्हणाले की गेली ४५ वर्षे पवार कुटुंबातील सदस्य म्हणूनच त्यांच्याबरोबर आमची राजकीय कारकीर्द घडली आहे. त्यामुळे माझी द्विधा मनस्थिती असल्याने तटस्थ भूमिका घेतली आहे. जुन्नर तालुक्यातील कार्यकर्त्याशी चर्चा करून मी हा निर्णय घेतला असून नुकतीच कार्यकर्त्याची संबाद बैठक आयोजीत केली असल्याचे त्यांनी सांगितले.( Shirur News) अनेक संकटाच्या काळातही माजी आमदार वल्लभ बेनके यांनी पक्षनिष्ठा ठेवत जेष्ट नेते शरद पवार यांची साथ सोडली नाही.त्यातून चार वेळा आमदार होण्याचे भाग्य मिळाले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या माध्यमातून २००४ नंतर तालुक्यात अनेक विकास कामे झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. राष्ट्रवादी पक्षामुळे बिबट निवारा केंद्र, बिबट सफारी डीपीआर, पिंपळगाव जोगा कालवा, किल्ले शिवनेरी विकास परिसर, विज, रस्ते. बंधारे, याबरोबर अनेक कोट्यावधी रूपयांची विकास कामे मार्गी लावण्यात यशस्वी झालो आहे.( Shirur News)
चिल्हेवाडी धरणाच्या पाईपलाईन चा प्रश्न, आदिवासी मुलांसाठी वसतिगृह, हिरडा उत्पादकांचा प्रश्न, येडगाव धरणाजवळील यशवंतराव चव्हाण स्मारक, शेतकऱ्यांसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शून्य टक्के व्याजदराने पुरवठा व कोविड काळात मोलाची मदत केली आहे. यातून कॅबीनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांची साथ मिळाली आहे.( Shirur News)
माझे वडील व माजी आमदार वल्लभ बेनके यांची तब्येत ठीक नसताना दिलीप वळसे पाटील मला वडिलांसारखे मार्गदर्शन करत होते. या सर्व बाबींचा विचार करता मी माझी भूमिका तटस्थ ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी राष्ट्रवादी पक्ष व पक्षाची विचारधारा सोडणार नसल्याचे सांगितले.( Shirur News)
माझे आमदारकीचे दीड वर्ष बाकी असून अजितदादांच्या माध्यमातून संपूर्ण ताकदीनिशी जुन्नर तालुक्यातील विकास कामे मार्गी लावणार असल्याचे स्पष्ट केले. आईच्या सल्ल्यानूसार मी २०२४ ची निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. मात्र जनतेच्या कल्याणासाठी जनतेत राहण्याचा मी निर्णय घेतला आहे. जनतेच्या सेवेसाठी बेनेके कुटूंब नेहमीच कार्यरत राहण्याचे त्यांनी सांगितले.( Shirur News)