युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : परिक्षा संपल्या की सुट्टी लागते या सुट्टीत मामाच्या गावाला, निसर्गाच्या सानिध्यात किंवा समुद्रकिनारी फिरण्याची मजा काही ओरच असते. सध्या गुरूवार ( ता. १५ ) नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे मौजमजेसाठी गेलेले पर्यटक पुन्हा आपल्या घराकडे परतू लागल्याचे चित्र आहे. शहराकडचे नोकरदार ग्रामीण भागातील गंमतीजमती, रानमेवा आणी ग्रामिण भागातील खवय्या पार्ट्यांचा आस्वाद घेऊन परीतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सुट्टीत गजबजलेले पर्यटन स्थळ आता रिकामे झालेले पहावयास मिळू लागले आहे. (Holidays are over, academic year has started, tourist spots are empty)
उन्हाळ्यात शालेय परिक्षा झाल्यानंतर साधारणपणे एप्रिलच्या मध्यापासून शाळा बंद झाल्या होत्या. शालेय निकालानंतर ६ मे पासून शाळांना सुट्टी जाहिर झाली होती. (Shirur News) या कालावधीत राज्याच्या विविध भागात पर्यटन करण्यासाठी शालेय विद्यार्थी व पालक यांनी सुट्टीचा सहलीचेआयोजन केल्याचे पहावयास मिळाले. बहुतेक पर्यटक हा समुद्रकिनारी पर्यटन करण्यासाठी आकर्षला जात असतो.
खरे तर निसर्गसौंदर्य पहाण्यासाठी कोकण किनारपट्टीकडे पर्यटकांचा लोंढा वाढलेला पहावयास मिळतो. काही पर्यटक ग्रामीण भागातील कृषी पर्यटन केंद्रांनाही भेटी देऊन सहलीचा आनंद लुटतात. या काळात मुलाना पोहणे, घोडेस्वारी, विविध खेळ, विविध वनस्पतींची ओळख, रानमेवा चा आस्वाद तसेच ग्रामिण भागातील संस्कृती व खाद्यांचा आस्वाद लुटताना दिसतात. पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटल्यानंतर आता नवीन शैक्षणिक वर्षाची चाहूल सगळ्यांनाच लागली आहे. आपल्या पाल्यांना पंसतीनुसार प्रवेश मिळविण्यासाठी आता कोकणात व ग्रामिण भागात गेलेले बहुतांशी पर्यटक परतीच्या मार्गावर आहेत.
बाजारपेठ शालेय साहित्याने गजबजली
आता केव्हाही पाऊस पडू शकतो. त्यातून चक्रीवादळाची शक्यता सांगितल्या नंतर पर्य़टक लवकरच पुन्हा घराकडे परतला आहे. वाहतुकीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सुखरूप घरी परतण्यासाठी हा पर्यटक पुन्हा घरी परतला आहे. (Shirur News) त्यामुळे पर्यटन स्थळे आता सुनेसुने वाटू लागले आहेत. गुरूवार ( ता. १५ ) पासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात शालेय साहित्यांची दुकाने थाटली आहेत. शालेय साहित्यांबरोबर पावसाळ्यात लागणाऱ्या इतर साहित्यांची खरेदीने आता जोर धरला आहे.
महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची काळजी असते. गुणानुक्रमानूसार प्रवेश निश्चित होत असल्याने पालकांची त्या अनुषंगाने धावपळ सुरू झाली आहे. त्या नुसार इतर लागणाऱ्या कागदपत्रांसाठी तहसिल कचेरीत देखील गर्दी वाढलेली पहावयास मिळत आहे. (Shirur News) कागदपत्रांची जुळवाजुळव ही महत्वाची असली तरी देखील काही प्रवेशासाठी वैद्य़किय अधिकाऱ्यांच्या सहिचे आरोग्याचे दाखले घेण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात पालकांची धडपड वाढली आहे.
खाजगी शाळांमध्ये प्रवेशासाठी चढाओढ…
पहिली ते आठवी पर्यतचे शालेय पाठ्यपुस्तके शासनाकडून विद्यार्थ्यांना मोफत पुरवली जातात. त्यामुळे वह्या, दप्तरे तसेच शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्याची धावपळ होताना दिसत आहे. अलिकडे खाजगी शांळामद्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी पालकांमध्ये चढाओढ असते. अशावेळी खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचा लाभ मिळत नाही. पर्यायाने त्यांना बाहेरून पुस्तके विकत घ्यावी लागतात. त्यामुळे विक्रेत्यांना पुस्तके उपलब्ध ठेवावी लागतात.
गावागावात शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या असून यामधून प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी प्रवेशाची प्रक्रिया पुर्ण करावी लागते. यासाठी ज्या शैक्षणिक संस्थाची शिक्षणाची धोरणे, वार्षीक निकाल तसेच प्रायोगिक शिक्षण व शिक्षकांची योग्य सचोटीने शिक्षण पद्धती असेल. तेथे प्रवेश घेण्याकडे पाल्यांचा आग्रह असतो. यासाठी पालकांनी शाळा, कॅालेज चा योग्य अभ्यास करणे गरजेचे आहे. पाल्यांना सुरक्षित तसेच भवितव्य घडविणारे चांगले शिक्षण मिळेल अशा च ठिकाणि प्रवेश मिळवून दिला पाहिजे. त्यातून नेट, सिएटी तसेच इतर स्पर्धात्मक परिक्षांची तयारी पाल्याची झाली पाहिजे. अशा शौक्षणिक संस्थामध्ये पाल्यांचा प्रवेश घ्यावा.
राजेंद्र गावडे
सचीव, बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी हाजी.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : कारला अचानक लागली आग; कारचालकाचा आगीत होरपळून मृत्यू
Shirur News : मृग नक्षत्रात भरपूर पाऊस; पंचागकर्त्यांचे मत, हत्ती वाहन सुरु