Shirur News : शिरूर : जागतिक पातळीवर कोवीड हा महा भयंकर काळ होता. त्याला धिराने तोंड देणे आणि समन्वयातून त्याचा सामना करणे गरजेचे होते. मी आणि माझ्या सहकार्यांनी सर्व सामान्य जनतेसाठी आरोग्य प्रशासनाला साथ दिली. आरोग्य अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांनी लाख मोलाची साथ दिली. या जबाबदारीतून पळवाट काढली नाही. त्यामुळे लाखो लोकांचा जीव वाचविता आला. गहिवरून आपुलकीच्या भावना आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघातील ४२ गावचे राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी व्यक्त केले. (Handled ‘responsibility’ effectively without finding loopholes in Corona : ‘Mansingh Pachundkar’ President Ambegaon Shirur Vidhan Sabha Constituency Nationalist Congress)
मानसिंग पाचुंदकर यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी दिल्या शुभेच्छा
शुक्रवार ( ता. २ ) जून ला मानसिंग पाचुंदकर यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक दिग्गज पदाधिकारी, अधिकारी, पत्रकार, सामाजीक कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी सहकाऱ्यांनी कोवीड काळात सामाजीक आपुलकी दाखवत दिलेली साथ याबाबत गहिवरून आपुलकीच्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादी कॅाग्रसचे जेष्ट नेते व माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटिल यांनी ४२ गावांसाठी अध्यक्ष पदाची धूरा मानसिंग पाचुंदकर यांच्या वर सोपवली. (Shirur News) पद आले पण त्या पाठोपाठ कोवीड सारखा महाभयंकर काळ येऊन ठेपला होता. या काळात त्यांनी संपुर्ण मतदार संघातील जनतेसाठी आरोग्यासाठी धावपळ केल्याचे दिसून आले.
पाचुंदकर म्हणाले की, माझ्या राजकिय कारकिर्दीत कोरोनाचा काळ कठीण होता. खूप तणावाची स्थिती होती. स्वतः च्या आरोग्याची काळजी घेत मतदार संघातील जनतेची काळजी घेण्याची जबाबदारी होती. या काळात अनेक समस्या उभ्या राहिल्या. समन्वय साधून संवादातून मार्ग काढत लोकांचे प्राण महत्वाचे होते. मी २४ तास उपलब्ध राहिलो कुणीही मला सहज संपर्क करू शकत होते. (Shirur News) कोरोनासाठी विलगीकरण महत्वाचे होते. त्यामुळे गावात विलिनीकरण साठी जागा उपलब्ध करून देत होतो. य़ासाठी माझ्या कार्यकर्त्यांची मदत महत्वाची होती. मलठण, टाकळी हाजी येथे माजी आमदार पोपटराव गावडे, घोडगंगेचे माजी संचालक राजेंद्र गावडे यांच्या सहकार्यातून कोवीड सेंटर सुरू करण्यात आली होती.
रांजणगाव, कारेगाव येथे औद्यागिक वसाहतीच्या नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष महत्व दिले. त्यानंतर च्या काळात नागरिकांचे लसीकरण होणे महत्वाचे होते. त्यावेळी देखील कार्यकर्त्यांच्या एकजूटीने नागरिकांना लसीकरण करून दिले. गावागावात लस कशी उपलब्ध करून देता येईल. या बाबत काळजी घेऊन कोरोना घालविण्यासाठी वेळोवेळी आरोग्य खात्याच्या येणाऱ्या सूचना नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या कार्यकर्त्यासोबत दिवस रात्र केले आहे. कोरोना काळात आॅक्सीजन न मिळू लागल्याने अनेक रूग्णांचा मृत्यू झाला. (Shirur News)पण माझ्या मतदार संघात सगळ्यांना आॅक्सिजन मिळण्यासाठी योग्य काळजी घेऊन त्यांना पुरवठा केला. रेमडिसीवर हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात यशस्वी ठरलो. त्यातून देखील अनेक रूग्णांचे प्राण वाचू शकलो. कोरोनात आलेल्या संकटाने सगळ्यांना वेगळा मार्ग शोधण्यास भाग पाडले. त्यामुळे अनेकांना रोजगार देखील गमवावा लागला. त्या काळात मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला. आजही त्यांच्या कुटूंबाचे समाधान त्या काळात झाल्याने मनोमन समाधन वाटते.
परराज्यातील मजूरांना कंपन्या बंद पडल्याने घरचा रस्ता धरावा लागला. या काळात अनेक मजूर पायी आपआपल्या राज्यात जावू लागले. त्या वेळी तत्कालीन तहसिलदार लैला शेख यांच्या मदतीने त्यांना रेल्वे उपलब्ध करून दिली. त्यांची त्या काळातील उपजीवीकेची सुवीधा कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे आजही परराज्यातील मजूर कामगार हे पुन्हा याच भागात नोकरी निमित्ताने येताना दिसतात. त्यावेळी समाधान वाटते. पुरग्रस्थांना केलेली मदत असो की खेळाडूंना दिलेले प्रोत्साहन यामुळे त्यांच्या डोळ्यात दिसणारा ‘माणुसकीचा आधार’ पाहिला आहे. याच काळात तीन हजार जेष्ट नागरिकांना नेत्र शस्त्रक्रिया साठी मोफत शस्त्रक्रिया व चष्मे वाटप केले.(Shirur News) मिळालेली नवी दृष्टि यामुळे या जेष्ठांच्या चेहऱ्यांवर नव चैतन्य पहावयास मिळाले. मायेने डोक्यावर हात फिरवून दिलेला आर्शीवाद मी कधीही विसरू शकत नाही.
यापुढील काळात राष्ट्रवादी क्राग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी मी महत्वाची मानतो. या कोरोनाच्या संकटामुळे कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळाली आहे. भविष्यात मी तुमच्यातलाच एक बनून राहणार असून अशीच सेवा करणार आहे.
शब्दांकन : युनूस तांबोळी
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : धरण, कालवे, बंधारे यांचे रक्षण करा; शेतीसाठी दुष्काळात मुख्य साधन