Shirur News शिरूर : रांजणगाव गणपती एमआयडीसी व कारेगाव (ता. शिरूर) येथील पोलीस ठाण्याच्या आवारात नुकतेच १०० हून अधिक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. (Shirur News) यामध्ये चिंच ,जांभूळ, नारळ पाच फूट उंचीच्या झाडांचा समावेश आहे. (Shirur News)
ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या वाढदिवसानिमित्तान विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम
ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्ताने व पर्यावरण दिनानिमित्त संपुर्ण एक महिना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वृक्षारोपणाचे आयोजन विद्यार्थी, अण्णासाहेब हजारे यांचे कार्यकर्ते, एमआयडीसी रांजणगाव ऑफिस कार्यालयातील अधिकारी, फियाट कंपनीचे प्रतिनिधी संयुक्त करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय कर्मचारी, विद्यार्थी ,पोलीस अधिकारी, एमआयडीसी कार्यालयातील अधिकारी संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
यावेळी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्याची पाहणी केली. पोलीस विभागाचे कामकाज कसे चालते याबाबत पोलिस अधिकारी बळवंत मांडगे यांनी आयपीसी, सीपीसी, सीआरपीसी याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. प्रथम खबरी अहवाला पासून कोर्टाकडून शिक्षा सुनावणे प्रशिक्षेची अंमलबजावणी कशी होते याबाबत अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.
दरम्यान, यावेळी अण्णासाहेब हजारे यांची लोकपाल अधिनियमपुस्तिका शासन दैनंदिनी याची वाटप करण्यात आले. वृक्षारोपणासाठी वृक्ष फियाट कंपनी व एमआयडीसी ऑफिस यांनी वृक्ष उपलब्ध करून दिले होते.
या कार्यक्रमासाठी रांजणगाव कारेगाव पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी बळवंत मांडगे, पोलिस उपनिरीक्षक शुभांगी कुटे, पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे, पोलीस हवालदार संतोष औटी ,पोलीस हवालदार ब्रह्मा पवार, आंबेकर , नागरगोजे , इनामे व एमआयडीसी ऑफिसचे अभियंता भूषण ठाणगे, शिवाजी खेडकर ,अमोल पाचुंदकर, गणेश कदम, कृष्णा कबले, सुरज कोल्हे, सतीश भिलारे, दामोदर नामदेव ताठे, भिमसेन अडसुरे, तुकाराम वाघमारे उपस्थित होते.