योगेश पडवळ
पाबळ, (पुणे) : कवठे येमाई येथे गुरुवार (दि. १४) रोजी आनंदाचा शिधा वाटप चालू करण्यात आले आहे. आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या शिधाचे वाटप करण्यात येत आहे. राज्यातील केशरी पिवळे रेशन धारक नागरिकांसाठी ही योजना आहे, या योजनेचा गोरगरीब जनतेने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्य शासनाची महत्त्वकांक्षी योजना असलेली आनंदाची शिधा ही जाहीर केल्याप्रमाणे गणेश उत्सवा निमित्त घरोघरी वाटण्याचा मानस शासनाने जाहीर केला होता. याचे वाटप सध्या रेशन दुकानांमध्ये चालू करण्यात आले आहे.
या योजनेचा शिधा वाटप चालु झाले असलेने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या शिधा वाटपाचा शुभारंभ उपसरपंच उत्तम जाधव, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन हौशीराम मुखेकर, माजी सोसायटी चेअरमन विक्रम ईचके, मारुती वागदरे, युवा नेते अविनाश पोकळे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर रोकडे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब पोकळे, शिरूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना अध्यक्ष गणेश रत्नपारखी या सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आले १) चणाडाळ एक किलो, २) रवा एक किलो ३) साखर एक किलो ४) खाद्यतेल एक लिटर, या सर्वांची किंमत केवळ शंभर रुपये आहेत.
मशीन वर अंगठा लावताना आपल्या पिशवीत चार पाकिटे असल्याची खात्री करावी. व रेशन ह्यावेळेस धान्य ९०टक्के उपलब्ध असल्यामुळे अजून १० टक्के रेशन धारकांना सुद्धा धान्य लवकरच मिळणार आहे आहे. असे आवाहन शिरूर तालुका रेशनदार दुकानदार अध्यक्ष गणेश रत्नपारखी यांनी केले आहे.
दरम्यान, आनंदाचा शिधा वापरल्यानंतर रिकामी होणारी थैली कृपया फेकून देऊ नये कारण त्यावर देवदेवतांचा फोटो आहे. ही रिकामी थैली रेशन दुकानदार यांच्याकडे जमा करावी अथवा घरी व्यवस्थित ठेवावी ती रस्त्यावर टाकून देऊ नये. युवा नेते अविनाश पोकळे