युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याकरीता शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर ५० हजार रूपयांपर्यंत लाभ देण्याची योजना आणली. मात्र तालुक्यात ही योजना फसवी ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. मागील एक वर्षापासून शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत असल्याने बळीराज्याकडून रोष व्यक्त केला जात आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने प्रत्येकी ५० हजार रूपये प्रोत्साहन अनुदानाची घोषणा केली. २० जुलै २०२२ ला या योजनेसाठी शासकीय पत्रकही काढण्यात आले. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले होते. हा प्रोत्साहन निधी शेतकऱ्याच्या खात्यात तत्काळ जमा होईल. (Shirur News) या आशेने शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरणासह विविध कागदपत्रे ऑनलाईन केली. स्थानिक पातळीवरील राष्ट्रीयकृत बॅका, जिल्हा मध्यवर्ती बॅका, ग्रामीण बॅंका तसेच विविध कार्यकारी संस्था यांनी देखील जोमाने कामे करून घेतली. एवढे सारे करूनही शेवटी शेतकऱ्याच्या पदरी निराशाच पडली. आजतागायत नियमित कर्ज भरणाऱ्या सभासदांना प्रोत्साहन प्राप्त झाले नाही. मागील वर्षाच्या हंगामात शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला. काहि ठिकाणी अती पावसाने पिके हातची गेली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून कांदा सारखे पिक देखील वाया गेले. तर रब्बी हंगामात पिके उभी करताना शेतकऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागली. या काळात शेतकऱ्यांने पु्न्हा जमीन कसण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर देखील रब्बी हंगामातील पिकांनी दगा दिल्याचे दिसून आले. सध्या तरी चालू हंगामात प्रोत्साहन निधी मिळेल. या आशेवर असताना सुद्धा पदरी निराशाच पडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
लोकप्रतिनीधी मूग गिळून गप्प
सरकार बदलले तसे योजना देखील बदलल्या गेल्या. त्यामुळे प्रोत्साहन निधी देखील शासनदरबारी गायब झाल्याचे दिसून येत आहे. आपली राजकीय पोळी भाजण्याकरिता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मते मागणारे लोकप्रतिनीधी देखील आता मूग गिळून गप्प आहेत. स्थानीक गाव पुढारी देखील या बाबत काहिच बोलत नसल्याचे चित्र आहे. (Shirur News) त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. शासनाने जाहिर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मोबदला तत्काळ द्यायला हवा. काही त्रुटी असल्यास कळवा. प्रोत्साहन निधी पासून शेतकऱ्यांना वंचीत ठेवू नका. असे शेतकरी नाथा जोरी व सखाराम खामकर यांनी विचार मांडले.
शासनाने महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर निधी देण्याचे परिपत्रक काढले होते. सध्याची नैसर्गीक पहाता शेतकऱ्यांना हा प्रोत्साहन निधी मिळणे अपेक्षीत आहे. (Shirur News) या बाबत जेष्ठ नेते माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्याशी चर्चा करून प्रोत्साहनपर निधी शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे काम केले जाईल.
मानसिंग पाचुंदकर
अध्यक्ष आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टी
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : एम. टी. डी. सी. च्या पर्यटक निवासांमध्ये योग दिवस साजरा करणार…
Shirur News : फादर्स डे विशेष…स्वाभिमानी बाप अन् धडपडणारी मुले!
Shirur News : कुकडीनदीवरील ढापे चोरून नेणा-यांना ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पोलीसांनी घेतले ताब्यात