Shirur News : नवरात्र म्हणजे, महिलांना शक्ती आणी उर्जा देणारा उत्सव. संयम व आत्मविश्वासाच्या बळावर तिने प्रत्येक क्षेत्रात गरूडझेप घेतली आहे. घर आणि समाजातिल मिळणारी जबाबदारी संभाळताना मुलांवर संस्कार करण्यातही ती कुठेच कमी पडत नाही. कुटूंब संभाळताना समाजाने गाव संभाळण्याची जबाबदारी मिळाली. तिला यशस्वीपणे संभाळत तिने कर्तृत्वाचा मोठा वाटा यशात बदलला. अशीच एक यशस्वी व कर्तृत्व संपन्न महिला म्हणजे शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला गावच्या आदर्श माजी सरपंच गायत्री चिखले होय.
गावाला विश्वासात घेऊन उभा केला विकासकामांचा डोंगर
पिंपरी दुमाला येथील सरपंच पदाचा कारभार हाती येताच गायत्री चिखले यांनी सर्व गावाला विश्वासात घेऊन विकास कामांचा डोंगर ऊभ करायच काम केले. सन २०१५ साली पिंपरी दुमाला या गावची सरपंच म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. सर्वात प्रथम गावांमध्ये एकोपा आणि सामाजिक सलोखा तसेच आनंददायी वातावरण निर्मिती व्हावी म्हणून गावातील सर्व निवडणुका विविध पदाधिकाऱ्यांचे निवडी या बिनविरोध केल्या. (Shirur News) यामध्ये ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी ,मंदिर देवस्थान ट्रस्ट, शालेय व्यवस्थापन समिती, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अशा अनेक शासकीय समित्यांची बिनविरोध निवडीसाठी प्राधान्य दिले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची कायापालट करून शिक्षणाची दारे भौतीकदृष्या संपन्न करावयाचे ठरविले. या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असून शाळा द्विशिक्षकी आहे. या शाळेमध्ये दिवसेंदिवस पट खालावत व चाललेला होता. अशा या प्रसंगी आपली शाळा टिकावी, शाळेचे गत वैभव प्राप्त व्हावं. (Shirur News) यासाठी त्यांनी सर्वप्रथम शाळेच्या गरजांची निवड केली. शाळेचे मुख्याध्यापकांशी व शिक्षकांशी बोलून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यासाठी त्यांनी पाऊल उचलले. यानंतर शाळेला ज्या बाबी तातडीने पूर्ण करावयाच्या होत्या. त्या बाबी स्वखर्चातून पूर्ण केल्या. त्यांची शाळेविषयी तळमळ पाहून गावातील अनेक ग्रामस्थांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे शाळेचा विकास झाला.
कंपनी व लोक सहभागाच्या माध्यमातून आणखीन दोन शिक्षकांची नियुक्ती करून विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीचे अध्यापन मिळू लागले. परिसरातील कंपन्यांमार्फत शाळेच्या मोठ्या बाबी उदाहरणार्थ – शाळेची कंपाऊंड , नव्याने वर्ग बांधनी, शाळांमध्ये सुसज्ज शौचालय उभारणी, जुन्या इमारती काया पालट करणे, नवीन डिजिटल मुख्याध्यापक कार्यालय, विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी भोजन कक्ष , शाळेच्या आवारामध्ये सुंदरसा बाग- बगीचा, शाळेचे रंग काम , डिजिटल रूमसाठी आवश्यक साहित्य खरेदी अशा अनेक बाबींचा अंतर्भाव या शाळा विकासासाठी करण्यात आला.
गाव कृषिप्रधान असल्यामुळे संपूर्ण ग्रामस्थ हे शेतीवर ते अवलंबून आहेत. परंतु हमखास असे बारमाही सिंचनासाठी ते पाणी गावातील शेतकरी बांधवांना उपलब्ध नव्हते. अशावेळी त्यांनी जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवले.(Shirur News) गावातील ओढ्यांच संपूर्ण खोलीकरण, सिमेंट बंधारे व जलसंधारणाच्या इतर कामांमुळे गाव शंभर टक्के बागायती म्हणून ओळखला जातो. फळबागांचे प्रसिद्ध गाव म्हणून पिंपरी दुमालाची ओळख झालेली आहे. त्यानंतर गावाच्या गायरान जमिन ६५ एकर जागेवरती ५४ हजार ६०० झाडांची वनविभागाचे मार्फत लागवड केली. त्या वृक्षांचे संवर्धन केले. आज पिंपरी दुमाला हरित व सुंदर होण्यामागे या वनविभागातील जमिनीमध्ये केलेल्या वृक्षारोपणाचा खूप मोठा हातभार आहे .
गाव हे महामार्गाच्या जवळ असले तरी देखील आजही गावांमध्ये एसटी येत नाही व अशा प्रसंगी दळणवळणाच्या महत्त्वाच्या कामासाठी रस्त्याचे काम त्यांनी शासनामार्फत पूर्ण केलं. गावातील महिलांसाठी आरोग्य शिबिरे , बचत गट प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम, गावांमध्ये संपूर्ण दारूबंदीसाठी प्रयत्न, दुर्बल वंचित गरीब घटकांसाठी घरकुल मिळवून देणे, स्त्रियांना सन्मान व आदर मिळण्यासाठी स्त्री जन्माचे स्वागत , झेंडावंदन सैनिक कुटुंब यांच्या हस्ते करणे अशा अनेक उपक्रम घेतले. लोकसहभागातून प्रवेशद्वार गावाची वेस बांधली , गावासाठी २ कोटी ३६ लाखांची मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असो, जिल्हा परिषद शाळा अध्ययवयात करणे असो व सरकारी निधीतून विज्ञान साहित्य संगणक, टॅब व विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था करणे , आज त्यांच्या गावातील प्रत्येक मूल जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश घेत आहे. (Shirur News) याशिवाय कायमस्वरूपी अंगणवाडी साठी जागा उपलब्ध करून दिली. पाण्याची व्यवस्था करून देत गावात एकोपा ठेवला आहे.
महिलेचे दैनंदिन जीवनात ती शारीरीक व मानसिकदृष्टया कणखर असणे फार गरजेचे आहे. यासाठी योगा व व्यायाम करणे फार गरजेचे असून आरोग्याच्या दृष्टिकोनातून ती ने सतर्क रहाणे फार गरजेचे आहे. शेती करणाऱ्या महिला या शरीरासाठी किंवा आपल्यासाठी वेळ देत नाही. आय़ुष्य हे क्षणभंगुर असून परमार्था बरोबर समाजहित जोपासण्याचे काम करावे. सामाजीक व राजकिय दृष्टिकोनातून पती, मुलगा, ग्रामस्थ तसेच कुटूंबांची साथ मिळाल्याने गावच्या विविध विकास कामात हिरहिरीने भाग घेऊन बदल घडवून आणला. त्यामुळे समाजातून विविध पुरस्काराने मला सन्मानित केले आहे.
गायत्री चिखले (माजी सरपंच-पिंपरी दुमाला, ता. शिरूर)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : सविंदणे येथील दोन विद्युत रोहीत्रांवर चोरटयांनी मारला डल्ला.