Shirur News : जांबूत : श्रीकृष्णाने गितेच्या माध्यमातून आचार, विचार व जगण्याच्या पद्धती समजावून सांगितल्या आहेत. परदेशात भारतीय म्हटल की जय श्री कृष्ण…असे बोलून भारतीय संस्कृतीचा महिमा वाढविला जातो. जगाने श्रीकृष्णाचे महत्व समजावून घेतले आहे. आपण देखील वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून गिता आचरणात आणत जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या संचालिका पुर्वा वळसे पाटील यांनी केले .
जांबूत येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन
जांबुत (ता. शिरूर) येथे श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्ताने अखंड हरीणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हभप हरीदास महाराज पालवे यांचे काल्यांचे किर्तन झाले. श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्यासाठी पुर्वाताई वळसे पाटील यांनी आवर्जून हजेरी लावली होती. (Shirur News) यावेळी शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, पंचायत समितीचे सदस्य डॉ. सुभाष पोकळे, माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी, सरपंच दत्तात्रेय जोरी, उपसरपंच राणी बोऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की जांबुत गावाने अध्यात्मिक वारसा व संस्कृती जतन करण्याचे काम सदैव केले असुन तिच पंरपंरा पुढील पिढीही घेऊन जात आहे त्यांचा आनंद आहे . (Shirur News) त्यामुळे या गावातील खंडोबा मंदीर सभामंडपासाठी सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातुन २५ लाख रुपयाचा निधी देण्यात आल्यांचे गावडे यांनी जाहीर केल.
यावेळी माजी सरपंच बाळकृष्ण कड, बाळासाहेब फिरोदिया, बाबाशेठ फिरोदिया, आंबेगाव तालुका राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुषमा शिंदे, युवती अध्यक्षा अक्षदा शिंदे, अनुसया महीला उन्नती केंद्राच्या समन्वयिका ज्योती निघोट, काठापुरचे सरपंच बिपीन थिटे, नाथा जोरी, योगेश जोरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.