Shirur News : सविंदणे : भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२२-२३ च्या गळीत हंगामातील ऊसाला कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यापूर्वी दिलेला २७५० रुपये भाव व अंतिम हप्ता ३५० रुपये जाहीर करण्यात आला. पिंपरखेड (ता. शिरूर) येथील ऊस उत्पादकांना अपेक्षेपेक्षा जास्त बाजारभाव दिल्यामुळे ऊस उत्पादकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
पिंपरखेडच्या शेतकऱ्यांचा पेढे वाटून आनंदोत्सव
याप्रसंगी घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, सरपंच राजेंद्र दाभाडे, माजी सभापती बाळशीराम ढोमे, अध्यक्ष किरण ढोमे, माजी सरपंच दामू दाभाडे, माजी सरपंच रामदास ढोमे, माजी सरपंच बिपीन थिटे, खरेदी-विक्री संघाचे संचालक संपत पानमंद, (Shirur News) भाऊसाहेब बोंबे, माजी सरपंच दिलीप बोंबे, अंकुश दाभाडे, बाळासाहेब बोंबे, किशोर दाभाडे, नरेश ढोमे, पोपट बोंबे, अप्पा गायकवाड, जयवंत बोंबे, उद्धव रोकडे, बाबुराव राक्षे, सुभाष घोडे तसेच काठापूर, चांडोह येथील ग्रामस्थ, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
भिमाशंकर कारखाना परिसरातील शेतकरी हा कारखाना उभा राहिल्यापासून सुजलाम्-सुफलाम् झाला आहे. कारखाना यापूर्वी देखील चांगला बाजारभाव देत होता व यापुढे देखील चांगलाच बाजारभाव मिळणार असल्याचे सरपंच बिपीन थिटे व संपत पानमंद यांनी सांगितले.
भिमाशंकर साखर कारखाना हा एकमेव कारखाना असा आहे की, कार्यक्षेत्रातील ऊस व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस या दोन्ही सभासदांना सारखाच बाजारभाव देत आहे. मात्र, जिल्ह्यातील काही जादा भाव देणारे कारखाने हे कार्यक्षेत्रातील ऊसालाच जाहीर केलेला बाजारभाव देतात. (Shirur News) कार्यक्षेत्राबाहेरील ऊसाला कमी बाजारभाव देतात. भिमाशंकर कारखाना असा कुठलाही भेदभाव न करता, सर्व ऊस उत्पादकांना समान बाजारभाव देत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे. भीमाशंकर कारखान्यात येणारा सुमारे ७५ टक्के ऊस हा कार्यक्षेत्राबाहेरील आहे, हे देखील समजून घेणे गरजेचे आहे.
– रामदास ढोमे, माजी उपसरपंच, पिंपरखेड
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : विठ्ठलवाडीच्या उपसरपंचपदी प्रतिभा वाळके यांची बिनविरोध निवड
Shirur News : दैनंदिन जीवनात स्वच्छता ही सवय बनवली पाहिजे – मिट्टूशेठ बाफना