Shirur News : पुणे : आपल्या मुलांना यशाचे शिखर गाठताना पाहणे, ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. मुलांना शिकवण्यासाठी कितीही कष्ट उपसण्याची त्यांची तयारी असते. वडनेर (ता. शिरूर) येथील गुरूनाथ विद्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या विठ्ठल अत्रे यांनी आपल्या मुलीसाठी एक उत्तुंग स्वप्न पाहिले. प्रसंगी प्रचंड मेहनत केली, पण मुलीच्या शिक्षणासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी ठेवली. वडिलांच्या श्रमाला मुलीने बळ दिले. अभ्यासात सातत्य आणि ध्येय गाठण्याचे उद्दिष्ट ठेवून समिक्षा विठ्ठल अत्रे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले. प्रतिकूल परिस्थीतीत समिक्षाने मिळविलेल्या यशाचे परिसरात कौतूक होत आहे.
एकाच वेळी करसहायक आणि लिपिक पदासाठी निवड
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. वडनेर खुर्द (ता. शिरूर) येथील समिक्षा अत्रे हिने राज्यातून मुलींमध्ये १८ वी रँक प्राप्त करत, ‘कर सहाय्यक’ पदाला गवसणी घातली आहे. याचबरोबर समिक्षा मंत्रालयातील लिपीक पदासाठी देखील पात्र ठरली आहे. (Shirur News) एकाच वेळी तिने दोन पदे प्राप्त केली आहे. यामुळे समिक्षाच्या यशाचे विशेष कौतूक होत आहे.
वडनेर खुर्द येथील एका चौकोनी गरीब कुटुंबात समिक्षाचा जन्म झाला. वडील विठ्ठल, आई सुप्रिया तर भाऊ वैभव असे समिक्षाचे लहान कुटुंब. घरची परिस्थिती बेताची होती. तिने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडनेर खुर्द (ता. शिरूर) येथे प्राथमिक घेतले. श्री गुरूनाथ विद्यालयात तिचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. तर निघोज (ता. पारनेर) येथील मुलीकादेवी विद्यालयात तिने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. या दरम्यान वडील विठ्ठल हे पौरोहित्य व भिक्षुकीचे काम करत होते. (Shirur News) त्यानंतर त्यांना श्री गुरूनाथ विद्यालयात चतुर्थ श्रेणी पदावर काम मिळाले. यातून त्यांनी मुलगा वैभव याला बीएससी पर्यंतचे शिक्षण दिले. शिपाई पदावर काम करत असताना अगदी कष्ट करून त्यांनी दोन्ही मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.
प्रतिकूल परीक्षेत यशाला गवसणी घालणारी समिक्षा म्हणते, कोविड काळात घरीच अभ्यास करावा लागला. या काळात अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. त्यानंतरही हार न मानता, पुणे येथे जाऊन अभ्यासात सातत्य ठेवले. प्रथम परीक्षेत ६१ तर मुख्य परीक्षेत १३५.७५ एवढे गुण मिळाले. (Shirur News) त्यातून कर सहाय्यक पदासाठी माझी नियुक्ती झाली. यापुढे राज्य सेवा परीक्षेसाठी अभ्यास करणार असून, त्यातून प्रथम श्रेणी अधिकारी बनण्याचा मानस आहे. अभ्यासामध्ये सातत्य व कष्ट करण्याची जिद्द असेल तर कोणतीच अवघड परीक्षा सहज सोपी होते, हे आजच्या तरुणाईने लक्षात ठेवले पाहिजे.
माजी आमदार पोपटराव गावडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे, अध्यक्ष बाबाजी निचित, सरपंच शिल्पा निचित, रतन निचित, संतोष निचित, प्राचार्य आर. बी. गावडे, माजी प्राचार्य प्रभाकर खोमणे, मुख्याध्यापक विलास घोडे, मिलन मिसाळ, अशोक दाते, मुख्याध्यापक जनार्दन साबळे यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे वडील विठ्ठल अत्रे यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : शिरूरमध्ये लाडक्या गणरायाचे उत्साहात स्वागत; घरोघरी बाप्पा विराजमान
Shirur News : निमोणे येथे पोलीस चौकी स्थापन करावी; ॲड. सुमित पोटे यांची निवेदनाद्वारे मागणी
Shirur News : सविंदणे येथे दोन रोहित्रांची चोरी ; शेतकरी हवालदिल..