युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : पाणी प्रश्न हा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. या भागात बांधलेल्या पाच धरणांच्या माध्यमातून ६५ बंधाऱ्यांमध्ये पावसाचे पाणी जेवढे पडेल तेवढेच द्यायचे. पुढील खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामातील आवर्तन द्यायची नाहीत, असा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय रद्द करून शेतकऱ्यांची आर्थिक सुधारणा होण्यासाठी शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड या तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी सुरक्षित ठेवणार आहे. समाजाच्या उन्नतीसाठी तुम्ही दिलेल्या ताकदीतून हे काम करत असल्याचे मत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
चिंचोली मोराची येथील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
चिंचोली मोराची (ता. शिरूर) येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जलजीवन मिशनच्या १९ कोटी ८५ लाख रूपयांच्या नळपाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. (Shirur News) त्यावेळी ते बोलत होते. वळसे पाटील म्हणाले की, शिरूर तालुक्यातील दुष्काळी असणाऱ्या चिंचोली मोराची, शास्ताबाद, धामारी, खैरेनगर, खैरवाडी, कान्हूर मेसाई तसेच पाबळ यासह अकरा गावांमधून पिण्याचे व शेतीच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी योजना डिंभा उजवा कालवा व चासकमान डाव्या कालव्यातून उपसा सिंचनच्या (लिप्ट इरिगेशन) माध्यमातून करण्याचे नियोजन आहे.
चिंचोली मोराची येथील पाणीपुरवठा योजना चासकमान उजव्या कालव्यातून केली जाईल. यामध्ये २४ हजार लीटर पाणी साठवण क्षमतेचा तलाव तयार करण्यात येणार आहे. या धर्तीवर इतर ११ गावांत देखील उपसा सिंचन साठवण करण्याचे काम करण्यात येईल. (Shirur News) त्यातून पाणी प्रश्न सोडविण्याचा मार्ग मोकळा होईल. सध्या महावितरणला शेतकऱ्यांच्या माध्यमातून ८० हजार कोटी रूपये थकबाकीला सामोरे जावे लागत आहे. त्यातून वीज महामंडळ तोट्यात असून, बिबट्यापासून सरंक्षण मिळण्यासाठी दिवसा वीज देण्याचा निर्णय घेत असतानाच वीज महामंडळाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी वेळप्रसंगी सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊ, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.
या वेळी आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, जिल्हा दूध संघाच्या माजी अध्यक्षा केरशताई पवार, भिमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनिता गावडे, घोडगंगा कारखान्याचे संचालक सुहास थोरात, शुभम नवले, युवा नेते संतोष भरणे, माजी सभापती सविता पऱ्हाड, श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, जलजीवनचे कार्यकारी अभियंता अर्जून नाडगोडा, सरपंच विमल नानेकर, बालाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदाशिव पवार, राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष बबनराव शिंदे, शिरूर खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अॅड. देवराम धुमाळ, राष्ट्रवादीच्या महिला सरचिटणीस नलिनी खर्डे, कान्हूर मेसाई च्या सरपंच चंद्रभागा खर्डे, अमोल जगताप, अजित कोहकडे, दत्तात्रेय कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
जाहिरपणाने सांगतो…
कुणाच्या मागे इडी लागली, कुणाच्या मागे इनक्मटॅक्स लागला तर कुणाच्या मागे सीबीआय लागले… याची चर्चा राजकारणात सतत होत असते. मात्र, मी तुम्हाला जाहिरपणाने सांगतो, दिलीप वळसे पाटील यांच्यामागे यापैकी काहीच लागलेले नाही. उजळ माथ्याने राजकारण आणि विकासाचे काम करायचे, समाजामध्ये एकी घडविण्याचा प्रयत्न करायचा, हेच माझे ध्येय आहे. याठिकाणी आलेल्या भगिनींच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. तुमचे देखील अनेक प्रश्न आहेत. ते सगळे सोडविण्याचे काम तुमच्या सहकार्यातून करायचे आहे. भविष्यात त्यासाठी तुमचा पुढाकार व सहकार्य महत्वाचे असेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरती नानेकर यांनी केले. सूत्रसंचालन निवृत्ती नानेकर यांनी केले. पार्थ नानेकर यांनी आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : शिक्रापूर येथे कामगारानेच चोरले १ लाख ८० हजारांचे भंगार..
+Shirur News : जमिनीच्या वादातून जमावाकडून दाम्पत्याला मारहाण; निमगाव म्हाळुंगीतील घटना;