Shirur News शिरूर : माऊली…माऊली चा जयघोष…टाळ मृदंगाची साथ, चिमुकल्या वैष्णवांचा अपार उत्साह, पारंपारीक वेषभुषा आणि पालखी सोहळ्यात अभंग, फुगड्या, विविध खेळ यामध्ये निघालेल्या दिंडीत चिमुकले वारकरी तल्लीन झाले होते. (Shirur News) जांबूत ( ता. शिरूर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यानी काढलेली दिंडी येथील ग्रामस्थांनी याची देही याची डोळा अनुभवली. (Shirur News)
जांबूत येथून दरवर्षी पायी दिंडी सोहळा पंढरपूरला जात
भालदार, चोपदार, विणा वादक, पताकाधारी, डोईवर हंडा व तुळस घेतलेल्या महिला वारकरी व दिंडीकर, टाळकरी, पखवाज वादक या पालखी सोहळ्याबरोबर विद्यार्थ्यांनी पारंपारीक वेशात पहावयास मिळाली. जांबूत येथून दरवर्षी पायी दिंडी सोहळा पंढरपूरला जात असतो. आज पंढरपूरला गेलेला पालखी सोहळा विद्यार्थ्यांनी हुबेहुब साजरा केला होता. येथील विठ्ठल रूख्मिनी मंदिरात ग्रामस्थांच्या हजेरीत अभंगाचे गायन व वादन झाले. त्यावेळी विद्यार्थ्यांबरोबर ग्रामस्थ तल्लीन झाले होते.
जांबूत ( ता. शिरूर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने येणाऱ्या आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात २०० मुलामुलींनी वारकरी वेशात,जय हनुमान भजनी मंडळ यांचे समवेत दिंडीचा आनंद घेतला.
दिंडीला सरपंच दत्तात्रेय जोरी, माजी सरपंच बाबा फिरोदिया, पोपट फिरोदिया, नाथा जोरी, शरद पळसकर,पंढरीनाथ गाजरे,शाळा व्यवास्थापन समिती अध्यक्ष माणिक जगताप ,उपाध्यक्ष मिलिंद थोरात,सोमनाथ रणसिंग,रामकृष्ण ढुमणे,नारायण राऊत ,अशोक गाडेकर ग्रामस्थ व महिला यांनी उपस्थिती दाखवली.
दरम्यान, या दिंडीचे नियोजन मुख्याध्यापक सुरेश शिंदे, शिवाजी दरेकर,विलास शिंदे,जयसिंग खामकर,म्हातारबा बारहाते,अर्जून गांजे,संतोष रणसिंग,लहू गाजरे व कल्पना जोरी यांनी केले होते.