Shirur News शिरूर : शिरूर तालुका वंचीत बहुजन आघाडीच्या उपाध्यक्षपदी कवठे येमाई (ता. शिरूर) येथील शरद उघडे यांची तर अमर उघडे यांची संघटकपदी निवड करण्यात आली. (Shirur News) त्यांच्या या निवडीने परिसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. (Shirur News)
शिरूर तालुका वंचीत बहुजन आघाडीची कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्यात आली. शिरूर तालुक्यात सामाजीक व शैक्षणीक क्षेत्रात उल्लेखनिय काम केल्याने शरद उघडे यांची शिरूर तालुका कार्यकारणीत उपाध्यपदी निवड करण्यात आली आहे. शिरूर तालुका संघटकपदी अमर उघडे यांची निवड करण्यात आली. राज्याचे प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे.
सध्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण तयार केले जात आहे. त्यामुळे वंचीत बहुजन आघाडी मधून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. शरद उघडे हे या वर्षीच्या पंचायत समितीसाठी इच्छूक उमेदवार असून त्यांची ही निवड सार्थ लागण्याची शक्यता आहे.
वंचीत घटकातील नागरिकांना विकासाच्या क्षेत्रात घेऊन जाण्याचे काम केले जाईल. तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लढा भविष्यात असणार आहे. वंचीत लोकांना शैक्षणिक सुवीधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल असणार आहे. नवनिर्वाचित उपाध्यक्ष शरद उघडे यांनी सांगितले.