योगेश पडवळ
Shirur News : पाबळ : पाबळ (ता. शिरूर) येथील श्री पद्ममणि जैन इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका जिजाबाई थिटे यांना यावर्षीचा विकासनाना दांगट पाटील जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आमदार रवींद्र धंगेकर यांच्या उपस्थितीत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
पुणे बिबवेवाडी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार रवींद्र धंगेकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व संस्थेचे कार्याध्यक्ष विकासनाना दांगट पाटील, संचालक प्रवीण शिंदे, शिक्षण मंडळाचे संचालक चिरंजीव दांगट, सचिव प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर उपस्थित होते. (Shirur News) पुणे जिल्ह्यातील शहर व ग्रामीण विभागातील एकूण ५५७ प्रस्ताव पुरस्कारासाठी प्राप्त झाले होते. त्यातील ३० शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी शिक्षकांना मार्गदर्शन करताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मा.अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, शिक्षकांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजामध्ये शिक्षणाला पूरक वातावरण कसे निर्माण होईल. यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. (Shirur News) आधुनिकते बरोबरच पारंपारिक शिक्षणातील अनेक चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे गरजेचे आहे. सुदृढ व सक्षम पिढी घडवण्यासाठी शिक्षक करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा देखील यावेळी सबनीस केली.
दरम्यान, कसबा पेठ विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग, माध्यमिक मराठी माध्यम विभाग, माध्यमिक इंग्रजी माध्यम विभाग,उच्च माध्यमिक विभाग,वरिष्ठ महाविद्यालय व संस्थेतील सर्व विभाग असे एकूण प्रत्येक विभागात ५ प्रमाणे ३० पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले.
थिटे यांनी मराठी विषयाच्या अध्यापनाबरोबरच स्काऊट गाईडच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या माझी माती माझी माणसं या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत. (Shirur News) गेल्या २५ वर्षापासून उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना आमची संस्था गौरवित असून पुढील वर्षापासून याला आणखी भव्य स्वरूप देणार असल्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष विकासनाना दांगट पाटील यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : शिरूर तालुक्यातील तलाठ्यांच्या गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली गांभीर्याने दखल
Shirur News : रांजणगावात बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना बेड्या
Shirur News : सरपण आणण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन बहिणींचा विनयभंग ; तरुणावर गुन्हा दाखल..