Shirur News : पुणे : केंद्रात काँग्रेस पाठोपाठ भाजपनेही जनतेचा भ्रमनिरास केला. टोमॅटो, कांद्याच्या किमती झपाट्याने गडगडल्या. बेरोजगारी, महागाई या समस्या आ वासून उभ्या आहेत. या समस्या मिटवण्यासाठी ठोस धोरण राबविण्यात सत्ताधाऱ्यांची दिरंगाई होत आहे. त्यामुळे तरुणाई नाराज असून, जनता त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशी टिका राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली.
आता जानकर कोणाचे टेन्शन वाढवणार?
शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाने दोन दिवसांच्या जनस्वराज्य यात्रेचे आयोजन केले होते. दुसऱ्या दिवशी शिरूर-हवेली मतदारसंघातील अनेक गावांमधून या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. न्हावरे (ता. शिरूर) येथे सांगता सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. (Shirur News)
या वेळी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव सुशिल कुमार पाल, राष्ट्रीय संघटक गोविंद सुरनर, प्रदेश महासचिव माऊली सलगर, पश्चिम महाराष्ट्र रासपचे अध्यक्ष संजय माने, उपाध्यक्ष सुनिल बंडगर, समन्वयक सचिन गुरव, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्षा सुवर्णा जऱ्हाड पाटील, रासपाच्या अनुसूचित जाती-जमाती सेलचे अध्यक्ष गणेश लोंढे, पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तान्हाजी शिंगाडे, रासप नेते रामकृष्ण बिडगर, हवेली रासपा तालुका अध्यक्ष भरत गडदे, शिरूर तालुका अध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे, पुणे शहर महिला अध्यक्षा सुनिता किरवे, शिरूर तालुका महिला अध्यक्ष चेतना पिंगळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी जानकर म्हणाले की, ज्या शाहू महाराजांनी देशात प्रथम आरक्षण धोरण लागू केले, त्यांच्याच मराठा समाजाला आज आरक्षणासाठी लढावे लागत आहे. मुख्यमंत्री पदापासून सर्व सत्तास्थाने ताब्यात असणाऱ्या मराठा समाजातील राजकारणी लोकांनी गरीब मराठा माणसांचा कधी विचार केला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे.
(Shirur News) मात्र, नोकरीत खासगीकरण करण्याचे धोरण केंद्र सरकार आखत आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीला कोणतीही परीक्षा न देता थेट जिल्हाधिकारी केले. मग आमच्यासारख्या गरीबांच्या मुलांनी रात्रंदिवस अभ्यास करून काय उपयोग? असा सवाल करीत, हे सरकार धनदांडग्यांचे असून, यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय समाज पक्षामध्ये कोणत्याही प्रस्थापित नेत्याचा पक्ष नाही. येथे सर्वसामान्य घरातील तरुणाला संधी दिली जात असून, सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारा हा पक्ष असल्यामुळे सर्वांनी पक्षाच्या पाठीमागे ताकदीने उभे रहा, असे आवाहन जानकर यांनी केले.
शिरूर, हवेली, आंबेगाव या तालुक्यांमध्ये गावागावातून राष्ट्रीय समाज पक्षाची जनस्वराज्य यात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी महिला व तरुणांनी जन स्वराज्य यात्रेचे जोरदार स्वागत केले. आता जानकर कोणाचे टेन्शन वाढवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : शिरूरमध्ये लाडक्या गणरायाचे उत्साहात स्वागत; घरोघरी बाप्पा विराजमान
Shirur News : निमोणे येथे पोलीस चौकी स्थापन करावी; ॲड. सुमित पोटे यांची निवेदनाद्वारे मागणी