Shirur News : शिरूर : यंदा पावसाचा जोर कमी असून, ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग पडण्याची शक्यता वाढली आहे. सध्या साोयाबीन पीक वाढीच्या तसेच फुलोरा अवस्थेत आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे सध्या सोयाबीन पिकावर चक्रीभूंगा, पांढरी माशी व खोडमाशी या किडींचा प्रादूर्भाव दिसू लागला आहे. किडरोगावर नियंत्रणासाठी कृषी विभागाने बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, असे आवाहन मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवदत्त निकम यांनी केले आहे.
शिरूर-आंबेगाव परिसरात पावसाने उघडीप दिल्याने तसेच दोन पावसांमध्ये अंतर पडल्याने चक्रीभूंगा, पांढरी माशी, खोडमाशी तसेच उंटअळीचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. चक्रीभूंगा अळीची मादी पानाच्या देठावर, फांदीवर किंवा मुख्य खोडावर दोन चक्राकार काप तयार करून, यामध्ये तीन छिद्र करते. त्यापैकी एकामध्ये अंडी घालते. (Shirur News) पिवळसर रंगाची ही अळी पानाचे देठ, फांदी व मुख्य खोडाचा आतील भाग फोखरून खाते. चक्री भुंग्याच्या प्रादूर्भावामुळे शेंगा धरण्याच्या प्रमाणात, दाण्यांच्या संख्येत तसेच वजनात घट येऊ शकते. लवकर पेरलेल्या सोयाबीन पिकावर चक्रीभुंग्याचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता जास्त असते.
खोडमाशीची फिक्कट पिवळ्या रंगाची अळी खोडात व फांद्यात प्रवेश करून आतील भाग पोखरून खाते. त्यामुळे किडग्रस्त झाड वाळते. किडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते. शेंगेतील दाण्याचे वजन कमी होऊन उत्पादनात १६ ते ३० टक्क्यांपर्यंत घट येते. (Shirur News) खोडमाशीची आर्थिक नुकसानीची पातळी १० टक्के प्रादूर्भावग्रस्त रोपे आहे. पांढऱ्या माशीची पिल्ले पानाच्या मागील बाजूस राहून पानातील रस शोषण करतात. परिणामी झाडांची वाढ खुंटते, पाने पिवळी होऊन गळून पडतात. प्रादूर्भाव अधिक झाल्यास फुले व शेंगा गळतात.
कुंपणच खाते शेत…
कृषी विभाग दर आठवड्याला एकात्मिक व्यवस्थापन अंतर्गत ऊस, मका, सोयाबीन या पिकांची पहाणी करून वरिष्ठ कार्यालयाला अहवाल देत असतो. त्यानंतर कृषी सल्ला देऊन प्रादूर्भाव रोखण्याचे काम होते. मात्र, शिरूर व आंबेगाव परिसरात सोयाबीनवर किडीचा प्रादूर्भाव झाला असून, याबाबत कृषी विभागाच्या कार्यालयातून कोणतीच माहिती शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन दिली जात नाही. कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, बांधावर न जाताच अहवाल देतात. (Shirur News) याचा अर्थ कुंपणच शेत खात आहे, असे चित्र सध्या परिसरात पहायला मिळत आहे. सध्या लष्करी आळी, खोडमाशीचा प्रादूर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कृषी विभागाने बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे. कृषी विभागाच्या सल्ल्याने सोयाबीनवर फवारणी करण्याचे आवाहन केले जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : गाडीला कट मारल्याच्या कारणावरून ट्रक चालकाला मारहाण; सणसवाडीतील घटना
Shirur News : पुणे जिल्ह्यातील मंत्र्याच्या गाडीवर कांदा फेकू – संचालक देवदत्त निकम
Shirur News : शिरूर तालुक्यातील बेट भागाचे नंदनवन – घोडगंगेचे माजी संचालक राजेंद्र गावडे