Shirur News : तळेगाव ढमढेरे : पारोडी (ता. शिरुर) येथे शिरुर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग कार्यालय तसेच ग्रामपंचायतीच्या सहकार्याने नुकतेच वनराई बंधारे बांधण्यात आले.
भूजल पातळी वाढण्यास मदत होणार
या वेळी शिरुर वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी गौरी हिंगणे, नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील, रेस्क्यू टीमचे सदस्य व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, अमोल कुसाळकर, सर्पमित्र शुभम वाघ, उपसरपंच अविनाश येळे, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लालासाहेब येळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी टेमगिरे, आप्पासाहेब टेमगिरे,(Shirur News) तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष रविराज टेमगिरे, ग्रामविकास अधिकारी मंगल लगड, कृषी अधिकारी संध्या सांडभोर, आदिनाथ ढमढेरे, स्वप्नील टेमगिरे, अतुल ढमढेरे, गणेश खेंगट, वसंत येळे आदी उपस्थित होते.
वनविभागाने बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांमुळे या भागातील भूजल पातळी वाढीस लागून ठिकठिकाणी पाण्याचा साठा होणार आहे. पाण्याच्या साठ्यामुळे पशु-पक्षांना देखील पाण्याची सोय होणार असल्याचे वनपरीमंडळ अधिकारी गौरी हिंगणे यांनी सांगितले. वनराई बंधारे हे पाणी अडवण्याचे मोठे काम करतात.(Shirur News) नागरिकांनी पाणीटंचाई तसेच पाण्याचे महत्व लक्षात घेऊन श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : टाकळी हाजीतील चार शिक्षकांना जिल्हा परिषदेचा शिष्यवृत्ती पुरस्कार
Shirur News : आंदोलक मनोज जरांगे यांना पाठिंब्यासाठी शिरूरला महिलांचे लक्षणिक उपोषण