बापू जाधव
Shirur News, शिरुर : शिरूर तालुक्यातील चासकमानच्या लाभक्षेत्रावर पावसाचा रुसवा तब्बल दोन ते अडीच महिन्यांपासून कायम असल्याने सगळ्यांची भिस्त कालव्याच्या आवर्तनावर आहे. मात्र, चासकमान प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पहिल्याच आवर्तनाचे तीनतेरा वाजले असून, टेल भागातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.
प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पहिल्याच आवर्तनाचे तीनतेरा
विधानसभेत कायदा झाला. प्रकल्पाचे पाणी प्रथम टेल भागाला मिळेल, असा ठराव देखील झाला. पण मागील पाच वर्षांपासून हा कायदाच पायदळी तुडवत टेल भागाचे अक्षरशः वाळवंट करण्याचे महापाप काही धनदांडग्यांनी केले आहे. (Shirur News) यंदा धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. तरिही चासकमान धरण शंभर टक्के भरले. नदीपात्रात पाणी सोडले; पण कालव्याला वेळेत पाणी सोडले नाही. मुळातच कालवा ५०० क्युसेक्सचा, मात्र प्रचंड गळती होत असल्याने शिक्रापूरच्या पुढे अगदी १५० क्युसेक्सने देखील पाणी मिळत नाही. त्यातच मनगटशाहीवर श्रद्धा असलेले भरदिवसा मशिन लावून कालवा फोडत असल्याने टेल भागासाठी चासकमानचे पाणी मृगजळ झाले आहे.
ऐन पावसाळ्यात पाणी मिळत नसेल तर पुढील काळात काय परिस्थिती निर्माण होऊ शकते या कल्पनेनेही शेतकऱ्यांना धडकी भरत आहे. (Shirur News) चासकमान प्रशासनाने वेळीच योग्य नियोजन केले नाही तर पाण्यासाठी यादवी सदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : डिंभा धरण ९१ टक्के भरले; उजव्या कालव्याला १५० क्युसेसने सोडले पाणी
Shirur News : शेरखान शेख… पशु-पक्ष्यांची भाषा जाणणारा शिरूरचा अवलिया!
Shirur News : बिबट्या-मानव संघर्षातून होणारे अपघात टळणार… की फक्त राजकारण होणार?