अमिन मुलाणी
Shirur News : कवठे येमाई : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे या संस्थेचा ८३ वा वर्धापन दिन सविंदणे (ता.शिरूर) येथे श्री गुरुदेव दत्त विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथम संस्थेचे संस्थापक बाबुराव घोलप, मामासाहेब मोहोळ व आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सविंदणे येथील श्री गुरुदेव दत्त विद्यालयात झाला कार्यक्रम
या कार्यक्रमाच्या प्रसंगी सविंदणे गावच्या सरपंच शुभांगी पडवळ, उपसरपंच भोलेनाथ पडवळ, माजी उपसरपंच भाऊसाहेब लंघे, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक सखाराम पुंडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी मनोगत, शिक्षक मनोगत व ग्रामस्थांचे मनोगत झाले. यातून संस्थेच्या व शाखेच्या कार्याविषयी माहिती सांगण्यात आली. (Shirur News) संस्था वर्धापन दिनानिमित्त विद्यालयात निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व विज्ञान प्रश्नमंजुषा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये प्रथम तीन क्रमांकांना कंपास व शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान, ही संस्था ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य जोपासलेली महाराष्ट्रातील नामवंत शिक्षण संस्था आहे. बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, (Shirur News) यासाठी बाबुराव घोलपांनी ७ सप्टेंबर, १९४१ रोजी ‘पुणे जिल्हा शिक्षण मंडळा’ची स्थापना केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित कोकरे यांनी मांडले. सूत्रसंचालन सुलक्षणा दुसाने यांनी केले व उपस्थितांचे आभार योगेश दुसाने यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्याबाबतचे धोके ओळखावे : दिलीप वळसे पाटील
Shirur News : लाखणगाव येथील अपघाती कुटूंबाच्या सांत्वनाला ‘ती’ ला ही अश्रु अवरेना…