युनुस तांबोळी
Shirur News : शिरूर : मोबाईल, दूरचित्रवाणीच्या जमान्यात विविध वाहिन्यांवरील मालिकांनी एक प्रेक्षकवर्ग मिळवला आहे. परिणामी जिवंत कला पाहण्याकडे प्रेक्षकवर्ग पाठ फिरवत आहे. त्यातून पूर्वापार मनोरंजनासाठी चालत आलेली पारंपरिक कला काळाच्या पडद्याआड जावू पहात आहे. यामुळे नवोदित कलाकारांनी रंगमंचावरील कलेची जोपासना करावी, असे मत विनोदी अभिनेते वसंत अवसरीकर यांनी व्यक्त केले.
पारंपरिक कला काळाच्या पडद्याआड जावू पहात आहे
पुणे, सांगवी येथे निळू फुले नाट्यगृहात पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या वतीने १६ व्या वर्धापनदिनाचे आयोजन करण्यात आले होते. (Shirur News) वसंत अवसरीकर यांना पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या वतीने त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. त्यावेळी झालेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
या वेळी बोलताना अवसरीकर म्हणाले की, प्रत्येक कलाकाराची वेगळी छबी लोकनाट्य तमाशामधून राज्यातील जनतेने अनुभवली आहे. अनेक तमाशा फड मालकांनी ही कला राज्याबरोबरच राज्याबाहेर नावारूपाला आणली. गण, गवळण, रंगबाजी, फार्स आणि वगनाट्याच्या माध्यमातून जुना प्रेक्षकवर्ग जागरूक ठेवला. (Shirur News) त्यातून विनोदी बाज, झेलकरी, ढोलकी सम्राट, शाहिर, नृत्यांगणा नावारूपाला आल्या आहेत. प्रेक्षक वर्गाने वगनाट्याकडे पाठ फिरवल्याने तमाशातील जिवंत कलेला वाईट दिवस आले. मराठी दिग्गज कलाकारांनी मला रंगभूमीची सेवा करण्याची संधी मिळवून दिली. त्यामुळे मी या क्षेत्रात टिकलो, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
या वेळी बेल्हे श्री साई दत्त नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत जगताप, संस्थापक अध्यक्ष विजय उलपे, कार्याध्यक्ष चित्रसेन भवर, संजय मगर, हेमा कोरबरी, राजेश जाधव, बाळासाहेब निकळसे, माधवी सातपुते, अमिर शेख, मिठू पवार, विलास अटक, मिरा दळवी, आमन तांबे, फिरोज मुजावर, गणेश गायकवाड, के. जी. कड, शिल्पा भवार, मेघराज भोसले, अनिल गुंजाळ, अर्जून जाधव उपस्थित होते.
नाटके, सिनेमांमध्ये अवसरीकर यांनी साकारल्या अजरामर भूमिका
विनोदी अभिनेते वसंत अवसरीकर यांनी गाढवाचे लग्न, बाई बिलंदर नवरा कलंदर, गावची जत्रा भानगडी सतरा, पाटील बायको सांभाळा, कथा अकलेच्या कांद्याची, टोपीखाली दडलंय काय, राजकारण गेल चुलीत, छबीदार नार गुलजार, कोण म्हणतंय टक्का दिला, एक होता विदूषक, बदाम राणी चावट गुलाम, कडी लावा आतली… अशी २० हून अधिक नाटके, सिनेमांमध्ये त्यांनी विनोदी भूमिका केल्या आहेत. जुन्या पारंपरिक लोकनाट्य तमाशाची त्यांना अधिक आवड आहे. राज्यात वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
विठाबाई नारायणगावकर स्मृती लोककला जीवन गौरव पुरस्कार, मराठी भाषा गौरव पुरस्कार, वांड्.मय पुरस्कार १०० हून अधिक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.(Shirur News) प्रवरानगर येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यस्तरीय कला गौरव विखे पाटील साहित्य पुरस्कार व मुंबई येथे अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते कृतज्ञता पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : पाणी नाही, तर मतदान नाही ! कान्हूर मेसाई येथे पाणी परिषदेत ठराव
Shirur News : बिझनेस लोन& क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल कल्पेश कोठारी यांचा यथोचित सत्कार
Shirur News : आंतरशालेय क्रिडा स्पर्धेत श्रीतेज बोऱ्हाडे, वैष्णव इचके यांचे यश