युनूस तांबोळी
Shirur News शिरूर : दुधाचे दर कमी झाले असतानाच पशुखाद्याचे दर वाढल्याने बळिराजाचे पशुधन धोक्यात आले आहे. मोसमी पाऊसही लांबणीवर पडल्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. (Shirur News) दर वाढल्याने खाद्याची मात्रा कमी होत असल्याने दूध उत्पादनावरही परिणाम जाणवत असल्याचे पशुपालक सांगत आहेत. (Shirur News)
तिव्र उन्हाळा असल्याने दुधाचे प्रमाणही घटते
उन्हाळा असूनही मुबलक सुका चारा नसल्याने पशुधन टिकवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. सुक्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पशुखाद्याचे दर वाढले असून दुधाचे दर कमी झाले आहे. त्यामुळे पशुधन टिकविण्याचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे. तिव्र उन्हाळा असल्याने दुधाचे प्रमाणही घटले आहे. याचा परिणामही खाद्याची मात्रा देण्यावर झाला आहे.
ओला व सुका चारा देखील मुबलक उपलब्ध नाही. त्यामुळे त्याचेही दर वाढल्याने दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. दरम्यान तीर्व उन्हाळा सुका चारा मुबलक नाही, खाद्याचे वाढलेले दर, दुधाचे कमी झालले भाव यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. राज्य सरकारने ही वाढ तातडीने थांबवावी व पशुधन वाचविण्याचा प्रयत्न करावा. अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
दरम्यान, या सगळ्या संकटामुळे शेतकऱ्यांचा पाळीव जनावरांची विक्री करण्याकडे कल वाढला आहे. जनावरांचे खाद्य विकणाऱ्यांनीही या परिस्थितीचा फायदा घेणे सुरू केले आहे.
तिव्र उन्हाळ्यात गायी कमी दुध देतात. त्यातून भाव वाढल्याने खाद्याची मात्रा कमी देण्याकडे शेतकरी वळाला आहे. त्यातून बाजारभाव कमी व खादयाचे भाव वाढले यातून शेतकऱ्याला आर्थीक नूकसान सोसावे लागत आहे. याकडे सरकारने लक्ष देऊन पशुधन वाचविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
राजेश सांडभोर
अध्यक्ष जिल्हा परिषद गट, राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीकच्चा माल मुबलक मिळत नसल्याने खाद्याचे दर वाढले आहे. दुधाचे दर कमी झाल्याने त्याचा परिणाम भेडसावत आहे. शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
पशुखाद्य विक्रेता