युनूस तांबोळी
Sankashti Chaturthi : (पुणे) ; विविध रंगी फुलांनी सजलेले श्री चिंतामणी मंदिर, चंदनाचा लेप लावलेल्या स्वयंभू मुर्ती ला हारतुऱ्यांची सजावट, धुप अत्तरचा दरवळत असलेला सुंगध यातून गणपती बाप्पा मोरया, मंगल मुर्ती मोरयाच्या जयघोषात चिंतामणीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले होते. (Sankashti Chaturthi)
चिंतामणीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल.
आरती साठी थांबलेला भावीकांचा जनसमुदाय यामुळे अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथे संकष्टी चतुर्थीला गुरुवारी (ता. ०६) सकाळपासून भर पावसातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. अशी माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आनंद तांबे यांनी दिली Sankashti Chaturthi)
चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आनंद तांबे यांनी सांगितले की, मंगलमुर्ती आगलावे यांच्या हस्ते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ‘श्रीं’ ची पूजा केली. ट्रस्च्या वतीने महापूजा करून सकाळी सहा वाजल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.
संकष्टी निमित्त मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल्स ग्राहकांनी गजबजले होते. दर्शन रांगा मुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी पहायला(Shirur News) मिळाली.
परिसरातील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, हार, फुल, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले आदी विक्रेते दिसून येत होते. तसेच रानभाज्या काकडी, वेगवेगळ्या प्रकारचे पेरू, नारळ, दुर्वा विकण्यासाठी महिला विक्रेत्या व नागरिक बसले होते. मंदिराचत येणारे भाविक परिसरातील आलेल्या रानभाज्या तसेच विविध साहित्य खरेदी करत होते. त्यामुळे या विक्रेत्यांचा व्यवसाय वाढलेला पहावयास मिळाला.(Shirur News)
दरम्यान, थेऊर परिसरात लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळी संजय महाराज हिवराळे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना काढण्यात येणार असून उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.(Shirur News)
कोट :-
याबाबत बोलताना चिंचवड देवस्थानचे विश्वस्त आनंद महाराज तांबे म्हणाले की, “संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात विविध प्रकारची फुले वापरून आकर्षक रांगोळी, फुलांची आरास, पायघड्या घालण्यात आल्या होत्या. वाढलेल्या उन्हामुळे सावलीसाठी मंडप व्यवस्था तसेच भाविकांसाठी स्वच्छता ग्रहाची सोय करण्यात आली होती. चिंचवड देवस्थानमार्फत भाविकांना उपवासाची खिचडीचे वाटप करण्यात आले.”(Shirur News)