युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील मा. बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९३.८५ टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्य आर. बी. गावडे यांनी दिली. यशस्वी विद्यार्थ्याचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. (Bapusaheb Gawde Vidyalaya in Takli Haji 93.85 percent)
सर्व विद्यार्थ्याचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी अभिनंदन केले
या विद्यालयातून ११४ विद्यार्थी परिक्षेसाठी बसले होते. त्यापैकी १०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या विद्यालयात प्रथम क्रमांक पायस भानुदास काने ९५.२०, व्दितीय क्रमांक ज्ञानेश्वर राजू वराळ ८६ टक्के, पुर्वा प्रकाश भाकरे ८६ ट्कके तर (Shirur News) तृतीय क्रमांक सिद्धी प्रकाश मोरे ८४ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्याचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार पोपटराव गावडे, सचीव राजेंद्र गावडे, सहसचीव सुनिता गावडे यांनी अभिनंदन केले आहे.
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन तर अयशस्वी विद्यार्थ्यांनी पुन्हा जोमाने या परिक्षेला सामोरे जावे. यशस्वी विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षण घेत असताना स्पर्थात्मक परीक्षांचा अभ्यास करावा. पुढील परीक्षा देखील आपले आयुष्य बदलणारी ठरणारी (Shirur News) असून त्यासाठी योग्य विषयांचा योग्य शिक्षकांकडून सल्ला घ्यावा. कोणतीही शाखा निवडताना आपल्या कलागुणांना वाव व आपल्याला मिळालेल्या गुणांचा अभ्यास करावा. ज्या विषयात तुम्हाला आवड असेल असेच क्षेत्राची निवड पुढील शिक्षणासाठी करावी.
राजेंद्र गावडे, सचीव, मा. बापूसाहेब गावडे विद्यालय टाकळी हाजी.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : जांबूतच्या आदर्श विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला
Shirur News : कवठे येमाई न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल ९४.७९ टक्के
Shirur News : जांबूत येथील जय मल्हार हायस्कूलचे दहावीत १२८ विद्यार्थी उत्तीर्ण; ९९.२२ टक्के निकाल