Shirur News : शिरूर : जीवन हे क्षणभंगुर आहे. माणसाच्या आयुष्याच्या वाटेवर कधी बोचणारे काटे तर कधी फुले उमलतात. हीच जगरहाट आहे. पण म्हणतात ना, सुख पाहता जवापाडे। दुःख पर्वताएवढे… त्याप्रमाणे दुःखाचे क्षण विसरायला माणसाला जास्त वेळ लागतो. या काळात मानवी मनात निराशेचे मळभ दाटून येते. या परिस्थितीत अश्रुंना वाट करून देण्यासाठी सक्षम खांद्याची गरज असते. मदतीचा हात हवा असतो. माणसाची हीच भावनिक आणि आर्थिक गरज ओळखून कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील सामाजिक कार्यकर्ते शहाजी दळवी यांनी ‘व्हाटसअॅप’च्या माध्यमातून मदतीचे आवाहन करत गरजूंसाठी निधी उभारण्याचे आवाहन केले. समाजातील पिडीत, दुखावलेल्या, गरजू व्यक्तींना या माध्यमातून मदतीचा ओघ सुरू झाला. ‘दुःखाच्या अश्रुंना मदतीचे बंध’ या त्यांच्या उपक्रमाचे परिसरात कौतूक होत आहे.
कान्हूर मेसाईच्या शहाजी दळवींची पिडीतांना ‘व्हाटसअॅप’ ग्रूपच्या माध्यमातून आवाहन करत आर्थिक मदत
ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी पुरेशा नसल्याने अनेकदा आर्थिक चणचण भासते. मोठ्या आजारपणात अचानक आर्थिक तरतूद करणे शक्य होत नाही.(Shirur News) गुंतागुंतीची ह्दय शस्त्रक्रिया असो, अपघात असो, गरीब-गरजूंना दुःखद प्रसंगी मदतीचा हात देण्याची निकड असो, अथवा निवारा नसलेल्या गरजूंना स्वतःचं घरकूल उभारण्याची गरज असो, दळवी नेहमीच खंबीरपणे साथ देत पुढाकार घेताना दिसतात.
दळवी यांनी मोबाईलवर सुरू केलेल्या ‘दुःखाच्या अश्रुंना मदतीचे बंध’ या ‘व्हाटसअॅप’ ग्रूपच्या माध्यमातून ते समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन करतात. यातून दातृत्व असणारे हात पुढे सरसावतात. दानशूर व्यक्तींनी केलेली मदत निकड असणाऱ्या व्यक्तीपर्यंत योग्य वेळेत पोहोचवण्याकडे त्यांचा कल असतो. व्हाटसअॅपच्या माध्यमातून त्यांनी अनेकवेळा मदतीचे आवाहन केले व मिळालेल्या मदतीतून दुःखातील व्यक्तीच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे यथोचित कार्य केले आहे.
या स्तुत्य उपक्रमाबाबत दळवी भरभरून बोलतात. दळवी म्हणाले की, पाबळ (ता. शिरूर) येथील चौधरी परिवारातील मुलांसाठी १ लाख ५० हजार रुपयांचा निधी व्हाटसअॅप ग्रूपच्या माध्यमातून केलेल्या आवाहनातून जमा झाले. यातून या कुटुंबाचे दुःख हलके करण्याची संधी मिळाली. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील जखमी होमगार्डसाठी २५ हजार रुपयांची मदत मिळाली. (Shirur News) पाबळ (ता. शिरूर) येथील दरोड्यात जखमी झालेल्या महिलांसाठी १ लाख १० रुपयांची मदत मिळवून दिली. कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील संदीप मिडगुले परिवारासाठी २ लाख २५ हजार रुपये, गोरक्ष माळवदे परिवारासाठी १ लाख ५० हजार रूपये, अंकुश ननवरे परिवारासाठी ५० हजार रूपये, थोरात परिवारासाठी ९० हजार रूपये, अंगणवाडीसाठी ५६ हजार रूपये, मिडगुलवाडी येथील रामदास शिवले परिवारासाठी २ लाख ५० हजार रूपये, मलठण येथील कुटुंबासाठी ३० हजार रुपये, मिडगुलवाडी येथील संदीप मिडगुले परिवारासाठी २ लाख ४० हजार रूपये, खैरनगर येथील अपघातातील चौधरी परिवारासाठी ७० हजार रूपये तर कवठे येमाई येथे कदम परिवारासाठी १८ हजार हजार रुपयांची मदत आतापर्यंत मिळवून दिली आहे. याकामी विविध संस्था, देणगीदार, ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन आवाहनातून मदत केली आहे.
मोबाईलवरील व्हाटस्अॅपच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करण्यापूर्वी परिस्थितीचा आढावा घेतला जातो. त्यानंतर ती परिस्थिती व्हाटस्अॅपवर मांडून मदतीचे आवाहन केले जाते. यामध्ये जमलेला निधी योग्य व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचे काम केले जाते. (Shirur News) निधीचा वापर कसा केला गेला, याबाबत आढावा देखील ग्रूपवर सादर केला जातो. त्यातून बॅंकेच्या खात्यातून पारदर्शकपणा आणला जातो. यामध्ये पिडीतांना मदत व्हावी असाच उद्देश असतो, असे दळवी यांनी या वेळी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : एक हात मदतीचा … सहकारी मित्रांकडून माणुसकीचे दर्शन
Shirur News : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी सुरक्षित ठेवणार- सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची ग्वाही