Shirur News : शिरूर : पिंपरखेड (ता. शिरूर) येथील ऊसाच्या शेताला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकरी धोंडिभाऊ रामभाऊ उंडे यांचा तीन एकर ऊस आणि दीड लाख रुपयांचे ठिबक जळून खाक झाले. सोमवारी (ता. १६) दुपारी झालेल्या या आगीच्या दुर्घटनेत उंडे यांचे सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती उंडे यांचे हिस्सेदार दशरथ देवराम गावडे यांनी दिली.
जळीत ऊसाचा पंचनामा महावितरणचे सहाय्यक अभियंता दीपक देशमुख, गावकामगार तलाठी अमोल ठिगळे, पोलीस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे यांनी केला. (Shirur News) आग लागल्यानंतर स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; परंतु उन्हाची तीव्रता आणि वाऱ्याच्या वेगापुढे उसाने मोठा पेट घेतल्याने आग विझवणे शक्य झाले नाही.
महावितरणचा बेजबाबदारपणा कारणीभूत
जळीत ऊस हा केवळ दहा महिन्यांचा असून, यासाठी सुमारे दीड लाख रुपये भांडवली खर्च उभा केला होता. अजून साखर कारखाने सुरू झालेले नसल्याने जळीत झालेल्या उसाचे काय करणार, असा प्रश्न या वेळी त्यांनी उपस्थित केला आहे. (Shirur News) या दुर्घटनेला पूर्णपणे महावितरण जबाबदार असल्याचे गावडे यांनी सांगितले. याबाबत योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या भागात ऊसाचे क्षेत्र मोठे असून, अनेक ऊसावरून विजवाहक तारा गेलेल्या आहेत. त्या तारांमध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे झोळ पडलेले असून, याबाबत आधीच्या काळात महावितरणला कल्पना देण्यात आलेली असल्याचे स्थानिकांनी सांगितले. (Shirur News) याबाबत सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत असून, महावितरणचा बेजबाबदारपणा यास कारणीभूत असल्याचे दिसून येते.
दरम्यान, यंदा कमी पर्जन्यमान असल्याने ऊस पिकाव्यतिरिक्त कोणीतीही पिके शेतकऱ्यांना घेता आली नाहीत. ऐन पावसाळ्यात दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागल्या असून, बँक, पतसंस्थांची कर्जे चुकती करण्यासाठी आणि कुटुंबाची गुजराण होण्यासाठी ऊस हेच पीक महत्त्वाचे असून, जर अशा प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास शेतकरी कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही. (Shirur News) यामुळे महावितरण विभागाने दिरंगाई न करता, जळीत बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ह.भ.प. रामदास गावडे यांनी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : दुर्गे दुर्घटभारी तुजवीन संसारी आदिवासी, पारधी, ठाकर समाजासाठी झटणारी रणरागिणी..
Shirur News : मुलांनो, पुस्तकांशी मैत्री करा, एक चांगले पुस्तक जीवन बदलू शकते : प्रा. बी. डी. चव्हाण