(Shirur News) शिरूर : अन्याय करणाऱ्यांबरोबर अन्याय सहन करणारे देखील तितकेच दोषी असतात. त्यामुळे व्यापाऱ्यांनी संघटीत होऊन अन्याय, अत्याचारा विरूद्ध उभे राहत पोलिसांशी संपर्क केला पाहिजे. तसेच दुकानांवर सिसीटीव्ही बसवून अत्याचार व चोरीला आळा घालता येईल. पोलिसी कारवाई ही जनतेच्या सहकार्याचा एक भाग आहे. असे मत सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांनी व्यक्त केले.चारंगबाबा मंगल कार्यालय येथे नुकतीच व्यापारी व पोलिस यांची संयुक्तिक बैठकीचे आयोजन करण्यात आली होत. त्यावेळी पन्हाळकर बोलत होते.
यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊली ढोमे, पोलिस पाटील सुदर्शन भाकरे, सर्जेराव बोऱ्हाडे, राहुल जगताप, भाऊसाहेब पानमंद, गौरेश दरेकर, लक्ष्मण भांबेरे, शाकूराव कोरडे, पोलिस कॅानस्टेबल सुरेश नागलोत, दिपक नागरे आदी व्यापारी उपस्थित होते
पन्हाळकर म्हणाले की, ”जांबूत, पिंपरखेड, चांडोह या परिसरात अनोळखी व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवा.” पंचतळे चौकात सीसीटिव्ही कॅमेरा बसविण्यासाठी सगळ्यांनी मदत करा. आपण दिलेली माहिती व माहितीदाराचे नाव गुपीत ठेवले जाईल. पोलिस तपासात तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. याची खबरदारी घेतली जाईल. पुणे जिल्हा पोलिस खात्याचे लक्ष सध्या पचंतळे जांबूत या परिसरावर आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सर्व व्यापाऱ्यांची संघटना तयार करण्यात येईल. त्या बरोबर या ठिकाणी गुरखा ठेवून हा परिसराच्या सुरक्षीतेची काळजी घेतली जाईल. असे एकमताने ठरविण्यात येईल.
कुजबूज व्यापाऱ्यांची …
शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात जांबूत, पिंपरखेड, चांडोह हा परिसर तसा शांततेचा मार्ग अवलंबणारा आहे. बेल्हा – जेजूरी हा महामार्ग येथून गेल्याने व्यापारीकरण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. अर्थकारण वाढल्याने या परिसरात लोकांची वर्दळ वाढली आहे. त्यातून अवैध धंद्याचा सुळसुळाट वाढला आहे. पोलिसांकडून जुजबी कारवाई न करता, या भागाच्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी अवैध धंद्यावर मोठी कारवाई होणे गरजेचे असल्याची कुजबूज व्यापाऱ्यांमध्ये रंगली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Shirur News : आमदाबाद विद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न